यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने हा पूल तयार करण्यात आला असून मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा आहे. या पुलावरून आता रहदारी सुरू झालेली आहे आणि त्याचा असंख्य लोक लाभ उठवत आहेत. पुष्पा या लोकप्रिय चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंधाना हिनेदेखील या पुलावरून प्रवास करण्याची संधी मिळाली आणि ती त्या प्रवासावर जाम खुश होती. भारताला आता कुणीही थांबवू शकत नाही, असे सांगत तिने एकप्रकारे झालेल्या विकासाची प्रशंसा केली.
एएनआय या वाहिनीशी बोलताना रश्मिका ट्रान्स हार्बर अटल सेतूबद्दल म्हणाली की, दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होत आहे, हे आश्चर्यजनक आहे. तुम्ही यावर विश्वासच ठेवू शकत नाही. असे काही होईल असे कुणाला कधी वाटले तरी असते का? आज नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई किंवा बेंगळुरू ते मुंबई हा प्रवास इतका सोपा झाला आहे तो या सगळ्या पायाभूत सुविधांमुळे. मला याचा अभिमान आहे.
ज्याचे सिनेमे चालत नाही अशा सुबोध भावेने स्टेटमेंट केले तर सगळे काँग्रेसी नाचायला लागले होते.
सातत्याने, सुपरहिट सिनेमे देणारी, नॅशनल क्रश @iamRashmika काय म्हणते ऐका!@Dev_Fadnavis भाऊंचे काम लय भारी!!
MTHL ते कोस्टल रोड सगळं काही स्वप्नवत!जळा 😂
pic.twitter.com/eKAwfgZrXy— बिल्व । Bilwa (@bilwa_speaks) May 14, 2024
शिवडी ते न्हावा शेवा हे अंतर या पुलावरून कापता येते. जवळपास २२ किलोमीटर इतके हे अंतर आहे.
हे ही वाचा:
उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आएंगे आएंगे योगी आएंगे
टीएमसी सरकारकडून आता मुल्ला, मदरसा, माफियांची सेवा
महादेव बेटिंग ऍपप्रकरणी ७० जण ताब्यात
संकुचित दृष्टिकोन नको, भारताने अमेरिकेला सुनावले
रश्मिका म्हणाली की, भारताने आता नकार ऐकणे बंद केले आहे. भारताला आता कुणीही थांबवू शकत नाही. बघा भारताच्या प्रगतीकडे! गेल्या १० वर्षांत भारताची प्रगती जबरदस्त झाली आहे. पायाभूत सुविधा, नवनव्या योजना, रस्त्यांचे नियोजन सगळे खूप सुंदर आहे. आता आपली वेळ आली आहे. हे सगळे गेल्या ७ वर्षांत झाले आहे. त्यात हा २० किमीचा प्रवास. माझ्याकडे तर शब्दच नाहीत.
रश्मिकाने सांगितले की, नवी पिढी प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. भारत हा स्मार्ट देश बनला आहे. भारतीय तरुण योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहेत. रश्मिकाने केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांना पोटदुखीही झाली आहे. त्यांनी रश्मिकाला ट्रोलही केले आहे.