अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी गुरुवारी दिली. या महत्त्वाच्या सुगाव्यांचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे.तांत्रिक विश्लेषणाचा भाग म्हणून ज्या कम्प्युटरवरून हा डीपफेक व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता, त्या सर्व कम्प्युटरचा आयपी ऍड्रेस शोधला जात आहे. तसेच, ज्या कोणी पहिल्यांदा तो व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केला, त्याचा शोध घेतला जात आहे.
रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती आले असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस हेमंत तिवारी यांनी यांनी दिली.रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडीओप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवल्यावर दिल्ली पोलिसांच्या ‘द इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स’ विभागाने ११ नोव्हेंबर रोजी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता. तत्पूर्वी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणी सोशल मीडिया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून याबाबत तातडीने उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हे ही वाचा:
दिल्लीमध्ये अल्पवयीन मारेकऱ्यांची संख्या वाढती!
“एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर टर्मिनल २ उडवणार” मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल
सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू
प्रकाश राज यांना १०० कोटी रुपयांच्या घोटाळयाप्रकरणी ईडीचे समन्स
‘डीपफेक हा प्रकार लोकशहीसाठी नवा धोका आहे,’ अशी टीका करून सरकारने अशा प्रकारच्या डीपफेक व्हिडीओंना रोखण्यासाठी सरकार लवकरच ठोस पावले उचलेल, असे सांगितले होते. तसेच, सोशल मीडिया कंपन्यांनी अशा प्रकारचे व्हिडीओ रोखण्यासाठी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दर्शवली होती.व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत रश्मिका मंदाना हिचा चेहरा एका महिलेच्या शरीरावर दिसत होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तिचा चेहरा तिथे बसवण्यात आला होता.