क्षत्रिय मराठा विचारे परिवाराच्या वतीने रश्मी विचारे, गीता विचारे यांचा सन्मान

नर्मदा परिक्रमा तसेच आर्क्टिक, अंटार्क्टिक मोहिमेबद्दल गौरव

क्षत्रिय मराठा विचारे परिवाराच्या वतीने रश्मी विचारे, गीता विचारे यांचा सन्मान

क्षत्रिय मराठा विचारे परिवार या संस्थेच्या वतीने रविवार २५ ऑगस्टला झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने तीन वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या रश्मी महेश विचारे तसेच आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशातील अभ्यास मोहिमेत सामील झालेल्या गीता हरेश विचारे यांना गौरविण्यात आले.

दादर येथील शारदाश्रम शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विचारे परिवार संस्थेच्या वतीने परिवाराच्या सदस्य असलेल्या या दोन्ही महिलांचा सत्कार करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या सर्वसाधारण सभेत २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची निवडही करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारिणीतील १३ जागांसाठी नव्या सदस्यांची निवड केली गेली. आता अध्यक्ष म्हणून विवेक विचारे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण विचारे हे गेली अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत होते. वयाची ९२ वर्षे पूर्ण केलेल्या श्रीकृष्ण विचारे यांच्याकडे आता विश्वस्तपद सोपविण्यात आले आहे. त्यावेळी नव्या कार्यकारिणी सदस्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

हे ही वाचा:

ममतांविरोधात डॉक्टरांचे ‘नबन्ना अभियान’, पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, पाण्याचा मारा !

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तिघांचा मृत्यू, सुमारे २०,००० लोक स्थलांतरित !

भाजपमध्ये प्रवेश करणार चंपाई सोरेन, दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट !

नव्या कार्यकारिणीतील सदस्य असे – प्रकाश विचारे, विजय विचारे, कविता विचारे, गौरी विचारे, चंद्रकांत विचारे, स्वप्नेश विचारे, चंदन विचारे, मुकुंद विचारे.

यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले अनुभव सांगितले आणि उपस्थित विचारे परिवाराचे सदस्यही त्यामुळे आनंदित झाले. रश्मी विचारे यांनी पायी चालत केलेल्या तीन नर्मदा परिक्रमांचा अनुभव कथन केला. पायी असो वा गाडीने प्रत्येकाने नर्मदा परिक्रमा जरूर करा आणि एका वेगळा अनुभव घ्या, असे रश्मी विचारे यांनी सांगितले तर गीता विचारे यांनी आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशातील आपल्या सफरीतील विस्मयजनक अनुभव सांगितले. विचारे परिवारातील या दोन भगिनींनी घेतलेल्या या अनुभवांबद्दल सर्वांच्याच मनात कुतुहल होते.

Exit mobile version