बापरे!! भोरमध्ये आढळला पांढरा कोब्रा

बापरे!! भोरमध्ये आढळला पांढरा कोब्रा

साधारण पणे पावसाळ्यात साप दिसणे काही नवीन नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास दुर्मिळ पांढरा साप सापडल्याने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. स्नेक कॅचरने दुर्मिळ सापाला पकडून वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडले आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यापूर्वी असाच दुर्मिळ पांढरा साप नागपूरमध्ये सापडला होता. एका माणसाच्या घरातून पकडलेला पांढरा साप नंतर जंगलात सोडण्यात आला.

अल्बिनो कोब्रा या नावाने ओळखला जाणारा हा पांढरा साप साडेचार फुटांपेक्षा जास्त लांब असल्याचे सांगितले जाते. या सापाला अल्बिनो कोब्रा असेही म्हणतात. सर्पप्रेमी पंकज गाडे यांनी वनविभागाच्या मदतीने सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

हे ही वाचा:

… म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

अल्बिनो कोब्रा जगातील १० दुर्मिळ अल्बिनो प्रजातींपैकी एक आहे. अल्बिनो कोब्रा प्रजातीच्या या अतिशय सुंदर दिसणार्‍या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पांढरा रंग आणि लाल डोळे. अनुवांशिक विकारामुळे लाखो अल्बिनो कोब्रा प्रजातींपैकी सापांचा रंग पांढरा होतो, हा एक दुर्मिळ योगायोग आहे.

Exit mobile version