रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रणजित सावरकर तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यादरम्यान, राहुल गांधी हे वीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. ठाण्यामध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आंदोलन करत आहे. तर नागपूरमध्ये भाजपा राहुल गांधींविरोधात आंदोलन करत आहे. तसेच मनसेसुद्धा राहुल गांधींच्या व्यक्तव्यामुळे आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असे आदेशच राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.

खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत जाऊन रणजित सावरकर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. रणजित सावरकर यांनी सांगितले की, मी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान केल्याप्रकरणी मी ही तक्रार दाखल करणार आहे. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करू पाहत असून तोच अजेंडा वापरून वीर सावरकरांचा अपमान करत आहे.

हे ही वाचा : 

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

आम्हाला परिवार नाही का? करमुसेंचा आव्हाड यांना सवाल

११ वर्षे सावरकरांसारखा यातना भोगणारा काँग्रेसचा नेता दाखवा!

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

राहुल गांधी यांनी पहिल्यांदा राहुल गांधी आणि काँग्रेसने सावरकरांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्यांनी सावरकरांचा अपमान केला आहे, असे रणजित सावरकर म्हणाले आहेत.

Exit mobile version