28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेष...तर हिंदूंना देश उरणार नाही!

…तर हिंदूंना देश उरणार नाही!

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचे परखड मत

अनेकदा भारतातील आंदोलनांना देशद्रोही अशा संघटनांकडून फंडिंग केलं जात. मुस्लिमांना मतदानासाठी संरक्षण दिलं जात. पण परत जर इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर हिंदूंना देश उरणार नाही. अनेक ठिकाणी आज हिंदू अल्पसंख्यांक झालेला आहे. मुंबईचा विचार केला तर रस्त्यावरचा प्रत्येक व्यवसाय मुस्लिमांच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळेच काही घडलं की लगेच त्यांचा जमाव येतो आणि तुम्ही काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे स्वसंरक्षण हे आपले कर्तव्य आहे आणि समाजाने एकत्र यायला हवं, असं परखड मत रणजित सावरकर यांनी मांडलं. ‘न्यूज डंका’च्या माध्यमातून ‘भारत भाग्य विधाता’ या मुलाखतीच्या मालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३९व्या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या मुलाखतीत रणजित सावरकर यांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. इतिहासात डोकावून पाहताना त्यातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.
ते म्हणाले की, सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला असे म्हणतात, पण द्विराष्ट्रवाद जो उफाळून आला तो १९२०ला. महात्मा गांधींनी तेव्हा मुस्लिमांना सांगितले की, तुम्हाला जर तुमच्या धर्माच्या पालनाचा अधिकार मिळत नसेल तर तुम्ही देश सोडून जावे किंवा तो अधिकार मिळवावा. तेव्हापासून हे चक्र २६ वर्षांनी फाळणी करून थांबलं. आताच्या किसान आंदोलनात किसान किती ? त्याला कॅनडा, इस्लामी देशांनी फंडिंग केले. तत्कालिन फायद्याकरिता याला पाठिंबा दिला जातो. त्यामुळे १९२०-२१ला जे झाले तेच आज काँग्रेस करते आहे.

रणजित सावरकर यांनी खिलाफत चळवळीचा मुद्दा उपस्थित करताना त्यातील गांधीजींच्या भूमिकेबद्दल त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, १९१९ साली खिलाफत चळवळ सुरू झाली. केमल पाशाला पदच्युत करण्यात आले. मुस्लिम बहुल राष्ट्रांनी त्यात लक्ष घातले नाही. पण भारतात त्याला विरोध झाला. भारताच्या मुस्लिमांशी त्याचा काहीही संबंध नव्हता. त्याला गांधींनीही पाठिंबा दिला. खिलाफत चळवळीविरोधात जी आघाडी उघडली त्याचे प्रमुख गांधी होते. ब्रिटिंशांना विरोध म्हणून आम्हाला अफगाणिस्तानचा अमिरही चालेल. ब्रिटिशांच्या जुलमापेक्षा आम्हाला अफगाणिस्तानचे अमिर चालतील, अशी गांधींची भूमिका होती. मी मुस्लिम व हिंदूंचा एकमेव नेता बनावे यासाठी गांधींनी हे केले. त्यामुळे मोपल्यांनी केरळमध्ये दंगली केल्या. ही वर्णने उपलब्ध असताना गांधी त्यांना माय ब्रेव्ह मोपले म्हणत होते. सीएए आंदोलनाचाही भारताच्या मुस्लिमांशी काय संबंध होता? १९१९मध्ये तुर्कस्तानचा केमाल पाशा आणि इंग्रज हे आपले शत्रू, पण मेले कोण तर हिंदू.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्ज्वल्य विचारांचा प्रसार करण्याचे कार्य स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकामार्फत सुरू आहे, त्याचा उल्लेख करत रणजित सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मसमर्पण केल्यानंतर अनुयायांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक निर्माण केलं. सावरकरांचे विचार जिवंत राहायला हवेत, प्रचार झाला पाहिजे यासाठी सावरकर स्मारकातून कार्य सुरू आहे. नेहरू शासकांनी सावरकरांना गांधी वादात अडकवले. सत्तेच्या बळावर त्यांनी सावरकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहचूच दिले नाहीत. सावरकरांनी सांगितलं की, विचार हे स्थायी राहू शकत नाहीत. परिस्थितीनुसार ते बदलायला हवेत. उपयुक्तता हा सावरकरांचा सिद्धांत आहे. आपल्या कृतीचा देशाला किती उपयोग आहे, याचा विचार करायला हवा.

ते पुढे म्हणतात की, १९२३ नंतर दिसणारे सावरकर हे हिंदू प्रणेते आणि समाजसुधारक म्हणून दिसतात. हिंदू समाजाने सावरकरांवर लक्ष दिले नाही. सावरकरांनी वेळोवेळी इशारे दिले होते आणि ते इशारे वेळीच लक्षात आले असते तर ते खरे होत गेले नसते. मुंबईतील सावरकर स्मारकात नवीन पिढीला सावरकरांच्या विचारांची ओळख व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, अशी माहिती रणजित सावरकरांनी दिली. कला क्षेत्रातून सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याकडे कल असून अनेक खेळांचे प्रशिक्षण वर्ग स्मारकात चालवले जातात. शिवाय सर्वांना खुले असे स्मारकाचे वाचनालय आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते सावरकर म्हणाले की, सशस्त्र क्रांतीचा मार्ग हा परकीय शत्रूंशी लढण्यासाठी असावा. आपल्या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी याचा उपयोग करू नये, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे होते. सावरकरांनी १९३७ला एक शस्त्रगीतही लिहिले. गांधी विचारसरणी प्रमाणे शस्त्र धारण करणे हे पाप आहे. मात्र, सावरकरांच म्हणण होतं की, शस्त्र धारण करण पाप नाहीये तर त्यामागचा हेतू काय आहे हे महत्त्वाच आहे. सरकारवर स्वसंरक्षणासाठी उपस्थित राहू नये तो आपला अधिकार आहे. त्यामुळे शाळांमध्ये सैनिकी शिक्षण द्यावं असं म्हणणं सावरकर यांच होतं, असेही रणजित सावरकर म्हणाले.

हे ही वाचा:

देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा

पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

सावरकर यांनी समाजावरही बोट ठेवले. ते म्हणाले की, आपला समाज हा अत्यंत व्यक्तीकेंद्रित आहे. आपल्यासाठी कोणीतरी लढेल अशी वाट समाज पाहात असतो. २०१४ पर्यंत पाकिस्तान खोड्या काढत होता. आपली भारतीय सेना तेव्हा पण सक्षम होती आणि आताही आहे पण आता मोदी सरकारच्या काळात त्यांना मोकळीक मिळाली आहे. अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतलेत, पण अनेक मुद्दे बाकी आहेत. यासाठी लोकांनी निदान पाच वर्षांनी मतदान करून योग्य व्यक्तीला निवडावे. समाज आता जागा झाला नाही तर १९४७ जे झालं ते पुन्हा होणार, असेही रणजित सावरकर म्हणाले.
आज जे सोशल मीडियावर सावरकरांप्रती अत्यंत खालच्या भाषेत टीका होते, त्यावर बोलताना रणजित सावरकर म्हणतात की, ज्यांचा सावरकरांना विरोध आहे त्यांनाही चांगलंच माहित आहे की सावरकर कोण आहेत? पण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ते विरोध करत असतात, अशी टीका रणजित सावरकर यांनी केली आहे. द विक ला आपण माफी मागायला लावली. शेवटी गौरव करणारा लेखही त्यांना छापावा लागला. आजची तरुण पिढी अंधविश्वासू नाही. ती अभ्यास करते. त्यामुळे सावरकर विचारांचा प्रचार करत राहणं आवश्यक आहे. पुढची पिढी चिकित्सक आहे, स्वसंरक्षणाची वृत्ती आहे. पूर्वी काँग्रेसच्या हातातील वर्तमानपत्रे होती पण आता परिस्थिती बदलली आहे, त्याचा आपण फायदा उचलायला हवा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा