सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची हत्या करणाऱ्याचे रणदीप हुडा याने मानले आभार

सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची हत्या करणाऱ्याचे रणदीप हुडा याने मानले आभार

सन २०१३मध्ये सरबजीत सिंगची हत्या करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन आमिर सरफराझ याला ठार मारणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे अभिनेता रणदीप हुडा याने आभार मानले आहेत. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी लाहोरमध्ये आमिरची गोळ्या झाडून हत्या केली.

‘कर्म… अज्ञात व्यक्तींचे आभार. माझी बहीण दलबीर कौर हिचे स्मरण आणि स्वपनदीप व पूनम यांना प्रेम. आज हुतात्मा सरबजीत सिंग याला काही प्रमाणात न्याय मिळाला,’ अशा शब्दांत हुडा याने ‘एक्स’वर भावना व्यक्त केल्या. रणदीप हुडा यने सन २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरबजीत’ या चित्रपटात सरबजीत सिंगची भूमिका केली होती. यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने दलबीर कौर हिची भूमिका केली होती.

आमिर सरफराझ उर्फ तांबा हा पाकिस्तानमधील वाँटेड अंडरवर्ल्ड डॉनपैकी एक होता. रविवारी दुपारी दीड वाजता दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी लाहोरमधील इस्लामपुरा भागातील त्याच्या घरातच हल्ला केला. त्याला जबर जखमा झाल्यने त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला.

पंजाबमधील रहिवासी असणारा सरबजीत सिंग याला हेरगिरी केल्याच्या आणि सन १९९०मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात १४ पाकिस्तानी नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र पाकिस्तानचा हा दावा त्याचे कुटुंबीय आणि भारतीय प्रशासनाने फेटाळून लावला होता. शेतीचे काम करत असताना तो चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा दावा सरबजीत सिंगच्या कुटुंबीयांनी केला होता.

हे ही वाचा:

सरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत

रामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

आमिर सरफराझच्या मृत्यूनंतर सरबजीत सिंग यांची मुलगी स्वपनदीप हिने सुरुवातीला समाधान व्यक्त केले. मात्र लगेचच हा न्याय नसल्याचे सांगितले. सरबजीत याची हत्या का करण्यात आली आणि यामागे कोण होते, याबाबत आम्हा कुटुंबीयांना कळलेच पाहिजे, त्यासाठी या खटल्याची सुनावणी व्हायला हवी, अशी मागणी स्वपनदीप हिने केली.

Exit mobile version