रांची: रामनवमीच्या मिरवणुकीपूर्वी १० घरांच्या छतावर सापडले दगड!

पोलिसांकडून सर्वांना नोटीस, ड्रोनद्वारे ठेवण्यात येणार पाळत

रांची: रामनवमीच्या मिरवणुकीपूर्वी १० घरांच्या छतावर सापडले दगड!

रामनवमीनिमित्त उद्या बुधवारी(१७ एप्रिल) रांचीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे.या संदर्भात रांची पोलीस देखील अलर्ट मोडवर आहे.एसएसपी चंदनकुमार सिन्हा यांनी सूचना दिल्यानंतर सोमवारी पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात असलेल्या घरांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांना माहिती मिळाली की, मेन रोड, तलाव रोड, हिंदपिरी येथील दहा घरांच्या छतावर दगड ठेवले आहेत.काही घरांमध्ये दगडाचा साठा एकाच ठिकाणी आढळून आला.दरम्यान, रांची पोलीस याबाबत अत्यंत गंभीर आहे.

ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी १० घरमालकांची ओळख पटवली आहे.पोलिसांनी या सर्वाना नोटीस पाठवली आहे.घराच्या छतावर ठेवण्यात आलेले दगड तात्काळ हटवण्याचे आदेश पाठवलेल्या नोटिसीमधून देण्यात आले आहेत.तसे न केल्यास शहरात कोणत्याही प्रकारची गडबड झाली आणि छतावर ठेवण्यात आलेल्या दगडांचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित घर मालकावर थेट कारदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगड: सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवादी प्रमुखासह १८ ठार!

आधी झालेले विसरा, म्हणजे नेमकं काय?

सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची देखील केली गेली होती रेकी

“सुनेला ४० वर्ष झाले तरी बाहेरची मग किती वर्ष झाल्यावर घरची?”

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जर दंगल झाली तर ड्रोनच्या माध्यमातून त्या घरांची अवस्था दिसेल.या कालावधीत घराच्या छतावर कमी दगड आढळल्यास दंगलीत दगडांचा वापर करण्यात आला आहे असे मानले जाईल.एसएसपींच्या सूचनेनुसार रामनवमी मिरवणूक शहरातील ज्या भागातून जात आहे त्या भागांवर ड्रोनद्वारे रविवार पासून नजर ठेवली जात आहेत.ज्या भागात दगड किंवा संशयास्पद वस्तू आढळतात त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येत आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.रामनवमीच्या संदर्भात पोलीस खूप गंभीर असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.कोणीही अफवा अथवा वातावरण बिघडवताना पकडले तर अशा लोकांना थेट तुरुंगात पाठवले जाईल , असे पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मिरवणुकीत साध्या वेषातही पोलीस तैनात असतील.शंभरहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याचाही सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version