रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

सिने उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवार, ८ जून रोजी पहाटे निधन झाल्याचे वृत्त आहे. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात ५ जून रोजी दाखल करण्यात आलं होतं. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे.

रामोजी राव यांचे खरे नाव चेरूकुरी रामोजी राव असं होतं. त्यांच्या जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी राव यांनी व्यवसाय आणि इंडस्ट्रीमधून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळावली. सिनेविश्वात काम करत असताना त्यांनी रामोजी ग्रुपची स्थापना केली. ज्यामध्ये जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू तेलुगु वृत्तपत्र यांचा समावेश आहे. रामोजी राव यांचे पार्थिव रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ते अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येईल. रामोजी राव यांना पद्मविभूषण सन्मानित करण्यात आलं होतं.

हे ही वाचा:

इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्यावर हल्ला; एकाला अटक

मी चुकलो…निवडणूक अंदाजाबद्दल प्रशांत किशोर यांनी दिली कबुली

मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे… मुख्यमंत्री शिंदेंनी वाचली मोदींसाठी खास कविता

रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, सहवेदना या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.

Exit mobile version