रामलल्लाची मूर्ती कठीण कसोटीतून साकारली

मूर्तिकार अरुण योगिराज यांनी उलगडला प्रवास

रामलल्लाची मूर्ती कठीण कसोटीतून साकारली

अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सगळीकडे ही मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगिराज यांची प्रशंसा होत आहे. याच सुप्रसिद्ध मूर्तिकारांनी हा मूर्ती घडवण्याचा प्रवास ‘अमर उजाला’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमधून उलगडला. त्यात त्यांनी मूर्ति घडवताना आलेल्या अडचणी विशद केल्या.

‘जूनपासून रामलल्लाच्या मूर्तीवर काम सुरू केले होते. ऑगस्टपर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र तेव्हाच राम मंदिर ट्रस्टचे नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, ज्या दगडांतून मूर्ती साकारली जात आहे, त्याच्या आठ चाचण्यांपैकी एका चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ते तीन महिने वाया गेले. त्यानंतर नवीन दगड निवडण्यात आला. त्याचाही अहवाल ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स’कडे पाठवण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये हा दगड उत्तीर्ण झाला आणि मी काम सुरू केले,’ असे अरुण योगीराज यांनी सांगितले. तीन महिन्यांत मूर्ती पूर्ण करण्याचा प्रवासही त्यांनी सांगितला.

हे ही वाचा:

“फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्यात”

स्वामी समर्थतर्फे व्यावसायिक कबड्डी ५ मार्चपासून

पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाप्रकरणी एक जण ताब्यात

इस्रोच्या लाँचपॅडवरील ‘चिनी ध्वजा’ च्या मुद्यावरून स्टॅलिन यांना चिनी भाषेत शुभेच्छा!

‘मी दररोज माझ्या कामाचे तास वाढवले. मी ११ ते १२ तास काम करत असे. मग १६ तास काम करू लागलो. माझ्यासमोर आणखी दोन कलाकार होते, जे त्यांच्या शिळेवर काम करत होते. त्यांची शिळा चाचण्यांमध्ये आधी उत्तीर्ण झाली होती. ते माझ्या तुलनेत चार महिने पुढे होते. आम्ही तिन्ही कलाकारांनी ठरवले होते की, आम्ही एकमेकांची मूर्ती पाहणार नाही. सात महिन्यांपर्यंत आम्ही तिन्ही मूर्तिकार एकत्रच होतो. एकत्र राहात होतो, खात-पित होतो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत होतो. मात्र मूर्तीबाबत आम्ही काहीच बोलायचो नाही. हा नियम आम्ही पाळला. आम्ही सर्व हे चांगल्या भावनेने केले. आम्ही शेवटच्या दिवशीच एकमेकांच्या मूर्ती पाहिल्या,’ असे योगीराज यांनी सांगितले.

रामलल्लाच्या नेत्रांचीही खूप स्तुती होत आहे. याबाबतही त्यांनी आठवणी सांगितल्या. ‘आम्हाला एक मुहूर्त देण्यात आला होता. नेत्र कोरण्याआधी आम्हाला शरयू नदीत स्नान करण्यास सांगितले. हनुमान गढी आणि कनक भवनात पूजा करून नेत्र कोरण्यासाठी २० मिनिटे दिली गेली. शिल्पशास्त्रात ज्या प्रमाणे सांगितले आहे, त्या प्रमाणे मी या २० मिनिटांसाठी चांदीचा हातोडा आणि सोन्याची छिन्नी बनवून घेतली होती,’ असे ते म्हणाले.

Exit mobile version