ऑलिम्पिक २०२४; नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकण्याची संधी !

नेमबाज रमिता जिंदाल, अर्जुन बबुता पदक जिंकण्यापासून वंचित

ऑलिम्पिक २०२४; नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकण्याची संधी !

भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत इतिहास रचला होतो. आता पुन्हा एकदा मनू भाकरला कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळाली आहे. मनू भाकरने भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगसह १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्रता मिळवली आहे. दरम्यान, भारतीय नेमबाज रमिता जिंदालची पदक जिंकण्याची संधी हुकली आहे. यासह पुरुष नेमबाज अर्जुन बबुता देखील पराभूत झाला आहे.

सोमवारी (२९ जुलै) १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारचा क्वालिफायर राउंड झाला. या प्रकारात भारतीय नेमबाज मनू भाकरने आणि सरबज्योत सिंग या जोडीने तिसरे स्थान मिळविले. त्यामुळे ते आता कांस्य पदकाची खेळतील. आज झालेल्या क्वालिफायर राउंडमध्ये तुर्की आणि सर्बिया देशाच्या जोड्यांनी पहिले दोन स्थान पटकावले, त्यामुळे ते सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरले. तसेच कोरियाची ये जीन ओह – वोन्हो ली ही जोडी चौथ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे आता मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचा सामना कांस्यपदकाच्या सामन्यात ये जीन ओह-वोन्हो ली यांच्या विरुद्ध होणार आहे. मंगळवारी (३० जुलै) दोन्ही भारतीय नेमबाजांमध्ये कांस्यपदकासाठी स्पर्धा होणार आहे.

हेही वाचा..

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन

“अनिल देशमुखांनी दाखवलेल्या फडणवीसांसोबतच्या फोटोला अर्थ नाही”

भारतीय युद्धनौका रशियन परेडमध्ये सामील, पुतीन यांनी मानले आभार !

खारघरमध्ये गोळीबार करत दागिन्यांच्या दुकानात दरोडा; लाखोंचे दागिने लुटले !

दरम्यान, रमिता जिंदालबद्दल बोलायचे झाले तर या भारतीय नेमबाजाने निराशा केली. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रमिताने सातवे स्थान पटकावले आणि पदक हुकले. रमिताने चांगली सुरुवात केली होती, पण दुसऱ्या मालिकेत ती मागे पडली आणि त्यानंतर तिला पुनरागमन करता आले नाही. तसेच नेमबाज अर्जुन बबुता देखील पराभूत झाला. १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत चांगली सुरुवात केल्यानंतर तो खराब शॉटमुळे पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला.

Exit mobile version