पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. १० मीटर एअर रायफल महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालने इतिहास रचला आहे.रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे २० वर्षांनंतर एका महिला खेळाडूने ही कामगिरी केली आहे.
रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ६३१.५ गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत १०० पेक्षा जास्त गुण मिळवले. तिने सहा मालिकांमध्ये १०४.३, १०६.०, १०४.९, १०५.३, १०५.३, १०५.७ गुण मिळवले. त्याच वेळी, याच स्पर्धेत, आणखी एक भारतीय ऍथलीट इलावेनिल वालारिवन ६३०.७ गुणांसह १० व्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही. रमिता जिंदाल उद्या (२९ जुलै) अंतिम सामना खेळणार असून सुवर्णपदकासाठी ती प्रयत्नशील आहे.
हे ही वाचा:
उरणमध्ये लव्ह जिहादमुळे उद्रेक, तरुणीची हत्या करून फेकून दिला मृतदेह, दाऊद शेखचा शोध सुरू
दिल्लीत कोचिंग सेंटरच्या तळघरात साचलेल्या पाण्यात तीन विद्यार्थी बुडाले !
ऑलिम्पिक २०२४; पहिल्या सामन्यात पीव्ही सिंधूचा दणदणीत विजय !
मराठा समाजाला फडणवीस यांनीच न्याय दिला !
दरम्यान , मनू भाकरनंतर पदक फेरी गाठणारी रमिता ही गेल्या २० वर्षांत दुसरी महिला नेमबाज ठरली. रमिता तिच्या प्रशिक्षक सुमा शिरूर (अथेन्स २००४ ) नंतर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला रायफल नेमबाज आहे.