रामेश्वरम कॅफे हल्ल्यातील आरोपींचे आयएसआयएसशी संबंध

एनआयएचा खुलासा

रामेश्वरम कॅफे हल्ल्यातील आरोपींचे आयएसआयएसशी संबंध

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना आयएसआयएसशी (ISIS) संबंध असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हा खुलासा केला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात एजन्सीने मुसावीर हुसेन शाजिब, अब्दुल मतीन अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. हे सर्वजण पाकिस्तानी हस्तकांच्या सूचनेनुसार भारतात हल्ले घडवण्याचे काम करत होते.

शुक्रवारी (१५ नोव्हेंबर ) झालेल्या या खुलाशात आरोपी आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी जोडलेले असल्याचे सांगण्यात आले आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. मात्र, चार आरोपी अद्याप कारागृहात आहेत. मुख्य आरोपी पाकिस्तानात असल्याचा संशय आहे. रिपोर्ट्सनुसार, रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट एकूण ६ दहशतवाद्यांनी मिळून केला होता. हे सर्वजण ISIS शी संबंधित आहेत. मुसाविर हुसेन शाजिब, अब्दुल मतीन अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुजम्मिल शरीफ यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला. 

हे ही वाचा : 

सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशी सुरु!

ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी दाखविली चमक

पवार म्हणतात, ‘ब्राह्मण’ही वोट जिहाद करतात!

बुलडोझर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही गंभीर मुद्दे

दरम्यान, या सर्व आरोपींवर विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. परदेशात बसलेले दहशतवादी यांना ऑपरेट करत होते. ‘मेहबूब पाशा’ अशा कोडवर्डचा वापर करत असत. क्रिप्टो करन्सीद्वारे यांना परदेशातून पैसे पाठवले जात असे आणि हा पैसा बेंगळुरूमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरला जाणार होता.

 

Exit mobile version