रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

रमेश केरे यांना तातडीने जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रमेश केरे यांना तातडीने जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आपण मराठा समाजाला कधीही विकले नाही. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तकांनी आपली बदनामी केली आहे. ही बदनामी असह्य झाल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे म्हणत रमेश केरे यांनी विष प्राशन केले.

विष प्राशन करताना, रमेश केरे हे फेसबुकवर लाईव्ह आले होते. रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये म्हटले की, मला माफ करा.सर्व बांधवांना हा माझा शेवटचा जय शिवराय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले.याची सरकारनेही दखल घेतली. मात्र, सोशल मीडियामध्ये माझी ऑडिओ क्लिप फिरवून माझी बदनामी केली जात आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठीत केली. त्याचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांना करण्यास मी विरोध केला. चंद्रकांत पाटलांचे हस्तक विनाकारण माझी बदनामी करत आहेत. ही बदनामी मी सहन करू शकत नाही. असे म्हणत त्यांनी विष प्राशन केले.

 

हे ही वाचा

रशियन सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११ सैनिकांचा मृत्यू

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

मात्र, त्यांना तातडीने मदत मिळाल्याने त्यांना उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे खळबळ उडाली असून, नेमके त्यांनी हे फेसबूक लाईव्ह कुठून केले, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

Exit mobile version