27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमहाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

समारंभात भाजपचे नेते सामील होणार

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी त्यांच्या नवीन पदाची शपथ घेणार आहेत. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज रात्री बैस मुंबईला रवाना होणार आहेत, विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

अधिकृत माहितीनुसार बैस संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.२ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर येथे जन्मलेल्या बैस यांनी संसदीय राजकारण, सामाजिक समस्या आणि संघटनात्मक कार्याचा पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बाईस यांनी नगरसेवक पदापासून ते केंद्रीय राज्यमंत्री आणि राज्यपालपदापर्यंत सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

हे ही वाचा:

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव

सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी खाली ठेवल्या बंदुका

इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

१९८९ मध्ये रायपूरमधून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. तेव्हापासून ते सहा वेळा म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पोलाद आणि खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून रमेश बैस कार्यरत होते. . ते १९९ ते २००४ या काळात रसायन आणि खते राज्यमंत्री आणि त्यानंतर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री होते.

विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. देशभरात १३ राज्यांमध्ये राज्यपालांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा