ज्ञानवापीनंतर कृष्ण जन्मभूमीबाबतही हाच निर्णय येईल!

स्वामी रामभद्राचार्य यांचा विश्वास

ज्ञानवापीनंतर कृष्ण जन्मभूमीबाबतही हाच निर्णय येईल!

ज्ञानवापीमध्ये व्यासजींच्या तळघरात पूजेला परवानगी मिळाली आहे. आता याच प्रकारचा निर्णय श्रीकृष्णाच्या जन्मभूमीबाबतही येईल. आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी घेऊच, असे वचन स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी दिले आहे. लाडपूर येथे सुरू असलेल्या रामकथेदरम्यान त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

ज्ञानवापी परिसरातील व्यासजींच्या तळघरातील मूर्तींची पूजा-अर्चा करण्यास जिल्हा न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानंतर सगळीकडे आनंद व्यक्त होत आहे. याचा आनंद स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनीही व्यक्त केला आणि आता श्रीकृष्ण रामजन्मभूमी घेऊ, असा निर्धार व्यक्त केला. ‘शंकराचार्य माझ्यावर टीका करत आहेत की, मी कधी तुरुंगात गेलो नाही, लाठ्या-काठ्या खाल्या नाहीत. मी तुरुंगात गेलो की नाही, याची माहिती ते काढू शकतात. मी लाठ्या-काठ्याही खाल्ल्या आहेत. न्यायालयात साक्षही दिली आहे. न्यायालयात साक्षही दिली आहे. त्यामुळेच निर्णयाची दिशा बदलली. आता श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत निर्णय येईल,’ असे स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी सांगितले.

हे ही वाचा:

३० वर्षांनंतर व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चेला सुरुवात!

“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

जनहितासाठी काम केले, रोजगाराच्या संधी वाढल्या, लोकांचे उत्पन्न वाढले!

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

आता संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले आहे. २०२४मध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. सर्वांनी प्रतिज्ञा घ्यावी, ज्या विरोधी पक्षांना राम-सीतेबद्दल प्रेम नाही, त्यांना मतदान करू नये. विरोधी पक्ष रामलल्ला मंदिरात गेलाच नाही, तर त्या विरोधी पक्षांना मत मागण्याचा काय अधिकार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Exit mobile version