रामायण फेम दीपिका चिखलियांची ‘आदिपुरुष’मधील कृती सॅननवर टीका

ओम राऊत-कृती सॅनन चुंबनप्रकरणावरून व्यक्त केली नाराजी

रामायण फेम दीपिका चिखलियांची ‘आदिपुरुष’मधील कृती सॅननवर टीका

कृती सेनन आणि आणि ओम राऊत यांच्यामधील चुंबन प्रकरणाने वादाचे स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणावरून दोघांना ट्रोल केले जात आहे. त्यावरून ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियाने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता प्रभास, कृती सेनन, सनी सिंह, देवदत्त नागे आणि सैफ अली खान अभिनित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. मात्र दिग्दर्शक ओम राऊत अभिनेत्री कृती सेननच्या गालाचे चुंबन घेत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘आजकालचे अभिनेते व्यक्तिरेखेत शिरत नाहीत. त्या व्यक्तिरेखेच्या भावना समजून घेत नाहीत. मला वाटतं, त्यांच्यासाठी रामायण हा केवळ एक चित्रपट असेल. कृती आजच्या पिढीतील अभिनेत्री आहे आणि तिने कदाचित स्वत:च्या आत्म्याला या व्यक्तिरेखेत झोकून दिले असेल. आजच्या पिढीत कोणाची गळाभेठ घेणे किंवा चुंबन घेणे हा प्रकार समोरच्या प्रती चांगल्या भावना व्यक्त करण्याची एक भावना समजली जाते. मात्र तिने कधी स्वत:ला सीता समजले नसेल,’ अशी प्रतिक्रिया दीपिका यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

आठ लाखांची लाच घेताना आयएएस अधिकाऱ्याला पकडले

‘अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार’

इजिप्तमध्ये पर्यटकाला शार्कने नेले पाण्यात ओढून; व्हायरल व्हीडिओमुळे थरकाप

ड्रेसकोड पाळणार नाही, ‘अबाया’ घालू द्या… काश्मीरमध्ये विद्यार्थिनींचे शाळेविरोधात आंदोलन

‘मी सीताची जी व्यक्तिरेखा स्वीकारली आहे, त्या व्यक्तिरेखेला आजकालच्या अभिनेत्री केवळ एक व्यक्तिरेखा म्हणून साकारतात. चित्रपट संपल्यानंतर त्यांना काही फरक पडत नाही. आमच्यावेळी तर कोणी आमचे नावही घेत नसत. काही जण तर आमच्या पाया पडत असत. आम्ही कोणाची गळाभेटही घेऊ शकत नसू. चुंबन तर लांबच राहिले. ‘आदिपुरुष’ चित्रपटानंतर हे सर्व दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र होतील आणि याला विसरूनही जातील. मात्र आमच्याबाबत असे कधी झाले नव्हते,’ असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version