रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे मंगळवारी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने ते ग्रस्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंदजी महाराज यांनी रात्री सव्वाआठ वाजता महासमाधी घेतल्याचे रामकृष्ण मिशनतर्फे मंगळवारी एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. त्यांना २९ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना ३ मार्च रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी यांनी स्वामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘त्यांनी अनेकांची मने आणि विचारांवर छाप सोडली आहे. त्यांची करुणा आणि बुद्धिमत्ता पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरित करेल. माझे त्यांच्याशी अनेक वर्षांपासून निकटचे संबंध राहिले आहेत. २०२०मध्ये केलेल्या दौऱ्यात मी बेलूर मठात त्यांच्याशी चर्चा केली होती. काही आठवड्यापूर्वीच मी त्यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.

मुख्यमंत्री बॅनर्जी यांनीही त्यांच्या संदेशात भिक्षुक, अनुयायी आणि भक्तांप्रति संवेदना व्यक्त केली. स्मरणानंदजी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले. या महान साधूंनी रामकृष्णवादींच्या विश्वव्यवस्थेला आध्यात्मिक नेतृत्व दिले. ते जगभरात लाखो भक्तांसाठी सांत्वनाचे स्रोत बनले आहेत, असे त्यांनी ट्वीट केले.

हे ही वाचा:

वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये

‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल

अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

२०१७मध्ये स्वीकारला होता अध्यक्षपदाचा कार्यभार

रामकृष्ण मठ आणि मिशनचे माजी अध्यक्ष स्वामी आत्मस्थआनंद यांच्या निधनानंतर स्वामी स्मरणानंद महाराजांनी जुलै, २०१७मध्ये रामकृष्ण मठ आणि मिशनचे १६वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता.

Exit mobile version