‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प राज्यात वेग घेणार!

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती

‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प राज्यात वेग घेणार!

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे ‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प संदर्भात बैठकी घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प राज्यात वेग घेणार असून लवकरच प्रकल्पाच्या कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘राम वन गमन पथ’ व्यतिरिक्त राज्य सरकार इतर अनेक कामांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्येही भगवान श्री राम आणि कृष्णाचे धडे दिले जाणार आहेत. कारण मुलांना आणि विद्यार्थ्यांना राम आणि कृष्णाचा मार्ग दाखवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये श्री राम आणि कृष्णाचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहेत.

हे ही वाचा:

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच बाबूंचे बुल्डोझरास्त्र!

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर!

अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

१२ मिराज-२००० लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत भारत-कतार दरम्यान चर्चा!

‘तीर्थक्षेत्रांचा विकास होणार’
मुख्यमंत्री यादव पुढे म्हणाले की, ‘मध्य प्रदेश सरकारने राम गमन पथ आणि श्री कृष्ण पथ गमन प्रकल्प आपल्या हातात घेतले आहे. भगवान राम आणि श्री कृष्ण यांनी राज्यातील ज्या-ज्या ठिकाणी भेट दिली आहे, त्या-त्या प्रत्येक ठिकाणांची ओळख करून ती ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री यादव यांनी सांगितले. तसेच भगवान कृष्ण आणि राम यांच्या जीवनाचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल. उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांमध्ये राम आणि कृष्णाचे धडे शिकविले जाणार आहेत. आमच्या जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या सर्व विषयांवर सरकार सातत्याने काम करत आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्प राज्यात वेग पकडणार असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version