अयोध्येमध्ये राम मंदिर, जगभरात वाढता भारताचा मान!

पंतप्रधान मोदी यांची विजयाची गॅरंटी

अयोध्येमध्ये राम मंदिर, जगभरात वाढता भारताचा मान!

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी सुरू होणार असताना नवे सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार, भारतातील मतदारांची मुख्य समस्या वाढती बेरोजगारी आणि महागाई आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मजबूत नेते म्हणून आणि जगभरात भारताचा मान वाढत असल्यामुळे केंद्रात सलग तीनदा भाजपचे सरकार स्थापन होत आहे, असेही यात म्हटले आहे.

हिंदू वर्तमानपत्राने लोकनीती-सीडीएसद्वारा केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे असे म्हटले आहे की, भारतातील २८ पैकी १९ राज्यांमध्ये १० हजार मतदारांपैकी २७ टक्के मतदारांची प्राथमिक चिंता बेरोजगारी होती. तर, २३ टक्के मतदारांनी महागाई ही दुसऱ्या क्रमांकाची समस्या असल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या दोन तृतीयांश म्हणजे ६२ टक्के मतदारांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नोकऱ्या शोधणे अधिक कठीण झाले आहे.

२२ टक्के लोकांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात अयोध्येतील राम मंदिराची स्थापना त्यांना आवडली. मात्र केवळ आठ टक्के लोकांची ही प्राथमिक चिंता होती. सर्वेक्षणात हे समोर आले आहे की, भारत जगभरातील सर्वांत वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असून पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र बेरोजगारीमुळे या वाढीला खीळ बसली आहे.

बेरोजगारीचा दर सन २०२२-२३ मध्ये ५.४ टक्के झाला, जो पंतप्रधान मोदी सत्तेत आले तेव्हा सन २०१३-१४ मध्ये ४.९ टक्के होता. गुणवत्तापूर्ण नोकऱ्यांची कमतरता आहे, असे म्हटले जात आहे. सर्वेक्षणात सहभागी ४८ टक्के लोकांनी राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर हिंदूंचा आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर, ७९ टक्के लोकांनी भारत केवळ हिंदूंचा नाही तर, सर्व धर्मांच्या नागरिकांचा आहे, असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

दिल्लीची लखनऊवर मात

इराणचा इस्रायलवर कधीही हल्ला होण्याची भीती

डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’

वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

सर्वेक्षणात लोकांना पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा सर्वेक्षणातील आठ टक्के लोकांनी भारताचा चांगली आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आवडल्याचे सांगितले.

Exit mobile version