भव्य राम मंदिरात रोज होणार पूजा; पहाटे चार वाजता रामलल्ला उठणार

दररोज सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले राहील.

अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर आता मंगळवार, २३ जानेवारीपासून होणाऱ्या रामलल्लाच्या पूजेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. यासाठी रामोपासना नावाने संहिता बनवण्यात आली आहे. या नियमानुसार, पहाटे तीन वाजल्यापासून पूजन आणि सजावटीची तयारी होईल. चार वाजता रामलल्लाला उठवले जाईल. आधी पाचवेळा आरती होत असे, आताही तसेच होईल.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाला दर तासाला फळ आणि दुधाचा भोग चढवला जाईल. दररोज सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले राहील. प्राणप्रतिष्ठेनंतर भक्तांच्या अधिक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे दर्शन १४ ते १५ तास होण्याचीही शक्यता आहे. रामलल्लाला सोमवारी श्वेतवर्णी वस्त्र प्रदान केले जाते. तर, विशेष प्रसंगी पिवळी वस्त्रे धारण केली जातात. ही प्रथा नव्या मंदिरातही सुरूच राहील. तर, मंगळवारी लाल, बुधवारी हिरवे, गुरुवारी पिवळे, शुक्रवारी फिकट पिवळा किंवा क्रीम कलर, शनिवारी निळा आणि रविवारी गुलाबी रंगाचे वस्त्र धारण करतील. बालकरूपातील रामलल्लासाठी राम मंदिर ट्रस्टने पुण्यातील हेरिटेज अँड हँडविव्हिंग चॅरिटेबल ट्रस्टकडून हातमागावर कपडे शिवून घेतले आहेत. १० ते १५ लाख कारागिरांनी हे कपडे शिवले आहेत.

हे ही वाचा:

एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा

येमेनमधील हौथी तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हवाईहल्ले!

एआयने केली कमाल आणि रामलल्ला करू लागले स्मितहास्य

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

या कारणांसाठी दिवसा बंद राहणार मंदिर

२३ जानेवारी रोजी ब्रह्म मुहूर्तावर सुमारे तीन वाजल्यापासून गर्भगृहाची स्वच्छता, पूजन आणि सजावटीची तयारी केली जाईल. साडेतीन ते चार वाजेपर्यंत श्री प्रभू रामाच्या दोन्ही प्रतिमा आणि श्रीयंत्राला मंत्रांच्या साह्याने जागे केले जाईल. त्यानंतर मंगलआरती होईल. त्यानंतर दोन्ही प्रतिमांना अभिषेक आणि भोग चढवला जाईल. आरती होईल. हे सर्व विधी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत होतील. त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होईल. दुपारी एक वाजता भोग आरती होईल. दोन तास दर्शन बंद राहील. तेव्हा प्रभू श्रीराम आराम करतील. दुपारी तीन वाजल्यानंतर पुन्हा दर्शनाला सुरुवात होईल, जे रात्री १०पर्यंत चालेल. याच दरम्यान संध्याकाळी सात वाजता संध्या आरती होईल.

Exit mobile version