तेरा तुझ को अर्पण

तेरा तुझ को अर्पण

प्रसिद्ध उद्योजक आणि न्यूज डंकाचे प्रमुख मार्गदर्शक प्रशांत कारुळकर यांनी आज शनिवारी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’चे कोषाध्यक्ष सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची पुणे येथील त्यांच्या आश्रमात भेट घेतली. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी पाच लाखांचा समर्पण निधी अर्पण करून या कार्यासाठी तन-मन-धन पूर्वक सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मूळचे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांचे शिष्य आहेत. २०२० मध्ये स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची नियुक्ती श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाच्या कोषाध्यक्ष पदी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यासाला पाच लाखांचे समर्पण देऊन या मोहीमेचा शुभारंभ केला. ही देणगी त्यांनी गोविंदगिरी महाराजांकडे सोपविली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे समर्पण गोविंदजी यांच्याकडेच अर्पण केले होते.

प्रशांत कारुळकरांनी कारुळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तीन पिढ्यांपासून वनवासी क्षेत्रात सुरू असलेल्या सेवा कार्यांबाबत स्वामीजींना माहिती दिली.

‘तुमचे वडील अरविंद कारुळकर यांच्याशी माझा उत्तम परीचय होता’, असे सांगून स्वामीजींनी प्रशांत कारुळकर यांना सुखद धक्का दिला. कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यावर स्वामीजी इतके खूष झाले की त्यांनी स्वत:च्या गळ्यातील माळ कारुळकर यांच्या गळ्यात घातली तर प्रशांत कारुळकर यांनी स्फटिक स्वरूपातील राम मंदिराची प्रतिकृती आचार्य गोविंद गिरीजी महाराजांना भेट म्हणून दिली. यावर आनंदी होत “फार क्वचितच अशा स्मरणीय भेटवस्तू मिळतात” अशी प्रतिक्रिया महाराजांनी दिली. 

राम मंदीरासाठी प्रशांत कारुळकर यांनी २५ लाखांची रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. उद्योग जगतातून मंदीर निर्माणासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी त्यांनी संपर्क मोहीमही सुरू केली आहे.

Exit mobile version