24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषरामलल्लाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ४० सूर्यस्तंभ झगमगणार!

रामलल्लाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ४० सूर्यस्तंभ झगमगणार!

अयोध्येत दररोज सुमारे ५० हजार भाविकांची वर्दळ

Google News Follow

Related

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. परंतु त्याआधीच रामलल्लाच्या दर्शनासाठी देशविदेशातील श्रद्धाळूंनी येथे गर्दी केली आहे. अयोध्येत दररोज सुमारे ५० हजार भाविक पोहोचत आहेत. रामलल्लाच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख रस्ते रात्रीही प्रकाशमान राहावेत, यासाठी सूर्यासारखे चमकणारे सूर्यस्तंभ बसवले जाणार आहेत. ३० फूट उंच असणाऱ्या या प्रत्येक स्तंभात एक वर्तुळाकार दिवा आहे. रात्री हा दिवा प्रज्वलित झाल्यावर सूर्याचा प्रकाश पडल्याचा भास होईल.

उत्तर प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धर्मपथावर असे ४० स्तंभ उभारले जाणार आहेत. हा पथ नव्या घाटाजवळ लता मंगेशकर चौकाला अयोध्या बायपासशी जोडतो. या सूर्यस्तंभ उभारणीचे काम २९ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या स्तंभांवर विशिष्ट प्रकारच्या फायबरचे आवरण आहे. ज्यावर जय श्रीरामाचा जयघोष आणि हनुमानाच्या गदेसहित अनेक पवित्र प्रतिकेही आहेत.

हे ही वाचा:

इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीमध्ये बॉम्बवर्षाव!

डम्परला धडकून बस पेटली; १२ जणांचा होरपळून मृत्यू!

प्रियांका गांधी- वड्रा पती पत्नी ईडीच्या कचाट्यात

इस्रो आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार

जगातील कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता रामजन्मभूमीवर भक्तांची गर्दी लोटली होती. रामजन्मभूमी पथावरच नव्हे तर हनुमानगढी, कनक भवन, शरयू तट आणि रामघाटावरही रामभक्त आवर्जून डोके टेकवत आहेत.

अयोध्या रेल्वे स्थानक आता अयोध्या धाम
रेल्वे मंत्रालयाने अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन केले आहे. बुधवारी या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला.

३० डिसेंबरला दिल्ली-अयोध्यादरम्यान पहिल्या विमानाचे उड्डाण
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर रोजी करतील. याच दरम्यान अयोध्या आणि दिल्लीदरम्यान पहिल्या विमानाचे उड्डाण होईल. एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान ११ वाजता दिल्लीतून निघून १२ वाजून २० मिनिटांनी अयोध्या विमानतळावर उतरेल. नंतर दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी हेच विमान दिल्लीसाठी निघेल. हे विमान दिल्लीत दोन वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा