इस्लामिक कट्टरवाद्यांनी रविवारी (१३ ऑक्टोबर २०२४) बहराइचमध्ये दुर्गा पूजा मिरवणुकीवर हल्ला केला होता. यावेळी इस्लामिक कट्टरवाद्यांनी राम गोपाल मिश्रा तरुणाची हत्या केली होती. राम मिश्राच्या हत्येनंतर संपूर्ण शहरभरात नागरिकांकडून निदर्शने करण्यात आली. दरम्यान, राम गोपाल मिश्राचा आता शवविच्छेदनाच्या अहवालात समोर आला असून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, रामला विजेचा शॉक देण्यात आला, अत्याचार करत त्याची नखे देखील काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, आरोपी अब्दुल हमीद आणि त्याच्या इतर मुस्लीम साथीदारांनी राम गोपाल मिश्राला विजेचा धक्का दिला, पायाची नखे उपटून धारदार शस्त्रांनी वार केले आणि त्याच्या शरीरावर तब्बल ३५ गोळ्या झाडण्यात आल्या. या सर्व जखमांमुळे त्याला ब्रेन हॅमरेज होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
राम गोपाल मिश्राची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच्या डोक्यावर आणि इतर अवयवांवर धारदार शस्त्रांनी खोल जखमा आढळल्या. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पहिले भाजपचे सक्रिय सदस्य!
भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!
कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा फायदा राहुल गांधींना झाला!
दरम्यान, दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी राम गोपाल याने एका इमारतीवर चढून हिरवा झेंडा खाली उतरवून त्या जागी भगवा झेंडा फडकावला. कट्टरवाद्यांनी देवी मिरवणुकीवर दगडफेक केल्यानंतर रामने हिरवा झेंडा खाली उतरवला होता. यानंतर आरोपींनी गर्दीतून तरुणाचे अपहरण केले आणि त्याच्यावर अत्याचार करून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल हमीद आणि त्याचा परिवार नेपाळला पळून गेले आहेत. याप्रकरणी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.