‘केशवा’ने घेतले ‘रामा’चे दर्शन

‘केशवा’ने घेतले ‘रामा’चे दर्शन

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केशव महाराज भारतात आयपीएल सामने खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून तो खेळणार आहे. आयपीएलच्या सामन्यापूर्वी त्याने अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “जय श्रीराम, सर्वांना आशीर्वाद.” ज्यात तो राम मंदिरात उभा असल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा फिरकीपटू प्रभू रामाचा मोठा भक्त मानला जातो.

सोशल मीडिया युजर्स सातत्याने या फोटोवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. राम मंदिर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे महाराजने एका मुलाखतीत सांगितले होते. याआधीही केशव महाराजने भारतातील अनेक मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत.

केशव महाराज फलंदाजीसाठी उतरताना ‘राम सिया राम’ हे गाणे वाजवले जाते. यावरही त्यांनी म्हटले होते की, ‘देवावरील माझी श्रद्धा खूप दृढ आहे. मी नेहमीच मानतो की देवाने मला दृष्टीकोन आणि मार्गदर्शन दिले आहे. मी नेहमीच कृतज्ञ आणि कृतज्ञ आहे. मी हनुमान आणि प्रभू राम यांचा कट्टर अनुयायी आहे.

अशी केशव महाराजची कारकीर्द


केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेकडून ५० कसोटी, ४४ वनडे आणि २७ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात केशव महाराजांनी ३१.९९ च्या सरासरीने आणि ३.१७ च्या इकॉनॉमीने १५८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १२९ धावांत ९ विकेट्स. याशिवाय त्याने ९ वेळा कसोटी सामन्यात ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. तर १ कसोटीत १० विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा :

जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!

अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणाऱ्या चीनला अमेरिकेने फटकारलं

केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला

“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

४४ वनडे सामन्यात ३०.६५ च्या सरासरीने आणि ४.५६ च्या इकॉनॉमीने ५५ फलंदाजांना बाद केले आहे. केशव महाराजांची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ३३ धावांत ४ विकेट्स. याशिवाय दक्षिण आफ्रिकेकडून २७ टी-२० सामन्यात केशव महाराजांनी २७.९६ च्या सरासरीने आणि ७.३९ च्या इकॉनॉमीने २४ विकेट्स घेतल्या आहेत. केशव महाराजांची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २१ धावांत २ विकेट्स.

Exit mobile version