27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष'सुरत' आणि 'उदयगिरी' वाढवणार भारतीय नौदलाची ताकद

‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ वाढवणार भारतीय नौदलाची ताकद

Google News Follow

Related

स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात आज भारत एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका ‘सुरत’ आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील ‘उदयगिरी’ या स्टेल्थ लढाऊ जहाजाचे आज मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे एकाच वेळी जलावतरण झाले. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे तयार करण्यात आलेली भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहेत

संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात या युद्धनौकांचे वर्णन देशाच्या सागरी क्षमता वाढविण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप असे केले. रशिया -युक्रेन संघर्ष आणि कोविड-19मुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येत असताना भारताने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले. महामारी असूनही जहाज निर्मिती सुरू ठेवून सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझगाव डॉक्स लिमिटेडचे अभिनंदन केले. या दोन युद्धनौका भारतीय नौदलाच्या शस्त्रागाराचे सामर्थ्य वाढवतील आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचे तसेच आत्मनिर्भरतेच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतील,असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता

मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा

‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं

गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश

काय आहे या युद्धनौकांची खासियत?
सुरत’ ही प्रोजेक्ट 15B या श्रेणीतील चौथी विनाशिका आहे, ज्याची निर्मिती P15A (कोलकाता श्रेणी ) विनाशिकेत महत्त्वपूर्ण बदल करून केली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी आणि मुंबई पाठोपाठ पश्चिम भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे व्यावसायिक केंद्र असलेल्या सुरत शहराच्या नावावरून या विनाशिकेचे नाव ठेवण्यात आले आहे. सुरत शहराला समृद्ध सागरी आणि जहाज बांधणीचा इतिहास आहे आणि 16व्या आणि 18व्या शतकात शहरात बांधलेली जहाजे त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी (100 वर्षांपेक्षा जास्त) ओळखली जात होती. सुरत ही विनाशिका ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून तयार केली गेली आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवर नौकेच्या सांगाड्याचे बांधकाम झाले आणि माझगाव डॉक लिमिटेड , मुंबई येथे ते एकत्र जोडले गेले आहे. या श्रेणीतील पहिली विनाशिका 2021 मध्ये कार्यान्वित झाली . दुसऱ्या आणि तिसऱ्या विनाशिकांचे यापूर्वीच जलावतरण झाले असून त्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

आंध्र प्रदेशातल्या पर्वतरांगांवरून ‘उदयगिरी’ या फ्रिगेट युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. ही प्रोजेक्ट 17A श्रेणीतील तिसरी फ्रिगेट युद्धनौका असून सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीसह P17 फ्रिगेट (शिवालिक श्रेणी ) नुसार याची बांधणी केली आहे.’उदयगिरी’ हे पूर्वीच्या लिअँडर क्लास एएसडब्ल्यू फ्रिगेट ‘उदयगिरी’चे नवे रूप आहे, जे 18 फेब्रुवारी 1976 ते 24 ऑगस्ट 2007 या तीन दशकांत आपल्या गौरवशाली सेवेत देशासाठी असंख्य आव्हानात्मक मोहिमांमध्ये सहभागी होते. प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत सात युद्धानौकांपैकी 4 माझगाव डॉक लिमिटेड( एमडीएल) इथे आणि 3 जीआरएसई येथे निर्माणाधीन आहेत. प्रोजेक्ट 17A प्रकल्पातील पहिल्या दोन युद्धानौकांचे 2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे एमडीएल आणि जीआरएसई येथे जलावतरण करण्यात आले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा