‘बॉलीवूडच्या सिनेमातून भारतीयत्व हरवले आहे’

राकेश रोशन यांनी केला पर्दाफाश

‘बॉलीवूडच्या सिनेमातून भारतीयत्व हरवले आहे’

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि अभिनेता राकेश रोशन यांनी हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूडचा पुरता पर्दाफाश केला आहे. ६ सप्टेंबरला आपल्या वयाची ७३ वर्षे पूर्ण करणाऱ्या राकेश रोशन यांनी बॉलीवूडची आज ही अवस्था का झाली याची परखड मीमांसा केली आहे.

राकेश रोशन म्हणतात की, आज जे विषय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक निवडत आहेत त्याच्याशी सर्वसामान्य चाहते जोडलेच जात नाहीत. राकेश रोशन म्हणतात की, तेलुगू, तामिळ फिल्म्स या आपल्या मुळांना धरून आहेत. शिवाय, ते त्यांनी अत्यंत आधुनिक पद्धतीने सादरही केले आहे. व्यावहारिक विचार करून या फिल्म्स बनवल्या जात आहेत. बाहुबली ही फिल्म तर माझ्या १९९५च्या करण अर्जुनसारखीच फिल्म आहे. या चित्रपटांचे संगीत हा त्यांच्या प्लस पॉइंट होता. आजही आपल्याला जुनी गाणी आठवतात. जेव्हा ही गाणी आपल्याला आठवतात तेव्हा त्यातील कलाकार, हिरोही आपल्याला आठवतो. सध्या चित्रपटात गाणीच नसल्यामुळे हिरोच लक्षात राहात नाही.

हे ही वाचा:

पहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी ‘मैदाना’त उतरलंय!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात मोदी ही अद्भूत व्यक्ती

नेताजींच्या अस्थिकलशाचा भारताच्या मातीला स्पर्श व्हावा

उद्धव ठाकरे पवारांकडून काही शिकलेच नाही…

राकेश रोशन म्हणाले की, सध्याच्या चित्रपटात भारतीयत्वच नाही. ते काहीतरी आधुनिक सिनेमा बनवायला जात आहेत. पण त्याचा संबंध फक्त १ टक्का लोकांशी आहे. तो चित्रपट ब आणि क श्रेणीतील लोकांना पसंत पडत नाही.

राकेश रोशनने टीका केली की, हे चित्रपट आपल्या मित्रांनी पाहावे म्हणून जणू बनवले जात आहेत. अगदीच कमी प्रेक्षकसंख्येपर्यंत हे चित्रपट पोहोचत आहेत. एक मोठा वर्ग या चित्रपटाला पोचपावतीच देत नाही. सध्या बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे सत्र सुरू आहे. त्या अनुषंगाने राकेश रोशन यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली मते व्यक्त केली.

 

Exit mobile version