स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

भारतीय उद्योगपती आणि स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचं रविवार, १४ ऑगस्ट रोजी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी राकेश यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

मागील काही दिवसांपासून राकेश झुनझुनवाला हे आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या ‘आकासा एअर’ या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आर्थिक जगतात मोठं योगदान त्यांनी दिलं आहे. भारताचा विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

राकेश झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीएदेखील होते. ऍपटेक आणि हंगामा मीडिया याचे झुनझुनवाला हे चेअरमन होते. तर व्हॉईसरॉय हॉटेल्स, प्रोवोग इंडिया, कॉनकॉर्ड बायोटेक आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता.

हे ही वाचा:

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

राकेश झुनझुनवाला यांनी वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. राकेश झुनझुनवाला जे शेअर घ्यायचे त्याच्या किंमती वाढायच्या असं गुंतवणूकदारांच म्हणणं होतं त्यामुळे ते कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे.

Exit mobile version