पहाटे पहाटे ऐकू येणारा चिमण्यांचा चिवचिवाट तसा दुर्मिळच झाला आहे. गेल्या काही वर्षांत शहरातूनच नाहीतर ग्रामीण भागातूनही चिमणीचे अस्तित्व नाहीसे होऊ लागले आहे. येणाऱ्या पिढय़ांना चिमणी पाहायला मिळेल की नाही अशी भीती निर्माण व्यक्त होत आहे. राज्यसभेच्या एका खासदारांच्या घरात मात्र रोज शंभरेक चिमण्यांचा तरी रोज चिवचिवाट कानावर पडतो.
ब्रिज लाल असे या राज्यसभा खासदारांचे नाव आहे. उत्तर प्रदेशच्या असलेल्या या खासदारांच्या घरापासूनच त्यांनी चिमणी संवर्धनाला सुरुवात केली आहे. ब्रिजलाल यांच्या घरात जवळपास ५० चिमण्यांची घरटी आहेत. या घरट्यांमध्ये १०० चिमण्यांचा चिवचिवाट सुरू असतो. ब्रिजलाल त्यांना नेहमी बाजरी, तांदूळ देऊन दाणापाणी करत असतात. उन्हाळा सुरू झाला असल्याने त्यांनी चिमण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.
या चिमण्यांचा घरात वाढलेला वावर बघून ब्रिज लाल यांनी आनंदात एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्या घरातील चिमण्या असे त्यांनी ट्विट केले आहे. माझ्या निवासस्थानी १०० पेक्षा जास्त चिमण्या आहेत. घरात चिमण्या अंडी घालू लागल्या आहेत असेही त्यांनी म्हटले आहे उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी घरात पाणी ठेवण्यास विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बहुत खूब! आपका यह प्रयास हर किसी को प्रेरित करेगा। https://t.co/k2ZbOrtcod
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2023
पंतप्रधान म्हणाले.. शाब्बास
चिमणी संवर्धनासाठी खासदार ब्रिजलाल यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ब्रिज लाल यांचे ट्विट रिट्विट केले आहे “शाबास! तुमचे प्रयत्न सर्वांना प्रेरणा देईल. अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा:
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!
११व्या मुलाच्या जन्मानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले…
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले
२० मार्च जागतिक चिमणी दिवस
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो