राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी गायिका आणि सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. राज्यसभेच्या सदस्यांनी एक मिनीट उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यसभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर एका तासासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, लता मंगेशकर यांच्या जाण्यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले असून एक चांगली पार्श्वगायिका देशाने गमावली आहे. लता मंगेशकर यांच्या रुपाने भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील एक उत्तुंग आणि दयाळू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या जाण्यामुळे जणू एका युगाचा अस्त झाला आहे. यामुळे संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी आहे, असे व्यंकय्या नायडू म्हणाले.

हे ही वाचा:

बुटात लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी

फिरकीसमोर वेस्ट इंडीजने गुडघे टेकले; हजाराव्या सामन्यात भारताचा दमदार विजय

….आणि हेमा झाली स्वरकोकिळा लता मंगेशकर

काल ६ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबईतील रुग्णालयात लता मंगेशकर यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी लता दीदींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लता दीदींना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात आज सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Exit mobile version