राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. काँग्रेसचे नेते असलेल्या अशोक गेहलोत यांचा एक व्हीडिओ आता चर्चेत आहे. त्यावरूनही गेहलोत यांच्यावर सोशल मीडियात टीका होत आहे.
So THIS is the way @ashokgehlot51 flies the tricolour? What an arrogant, uncouth man! pic.twitter.com/A062Cfmh0b
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) August 16, 2022
अशोक गेहलोत यांनी १५ ऑगस्ट या भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी केलेले ध्वजारोहण सध्या चर्चेत आहे. अशोक गेहलोत यांनी आपल्या निवासस्थानी हे ध्वजारोहण केले. जेव्हा ते आपल्या घरातून बाहेर आले तेव्हा एक सुरक्षा दलाचा अधिकारी दोरी धरून उभा होता. गेहलोत त्याच्याजवळ पोहोचले आणि त्यांनी ती दोरी धरून भराभर ओढली. ना त्याच्यात भाव होते ना आपुलकीची भावना. दोरी ओढल्यानंतर ती दोरी त्याच सुरक्षा अधिकाऱ्याच्या हाती सोपविली आणि ते राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. त्यांच्या या रुक्ष कृतीची चर्चा सुरू असून त्यावर लोक टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तिरंगा फडकावताना त्यात भावना ओतून कृती करायला हवी अशी अपेक्षा असते, पण अत्यंत कोरडेपणाने गेहलोत यांनी हे ध्वजवंदन केले, अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.
हे ही वाचा:
फिफाने केले भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित
वांद्रे येथे गोळीबार करणाऱ्याला केली अटक
पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित लक्ष्य
कोकण किनारपट्टी, प. महाराष्ट्र, विदर्भात सरीवर सरी
मुळात या निवासस्थानाच्या वर छतावर हा तिरंगा फडकाविण्याचा स्तंभ आहे. खरे तर वर जाऊन तिरंगा फडकाविणे अपेक्षित असते. पण जवळपास दुसऱ्या मजल्यावर असलेला हा तिरंगा फडकाविण्यासाठी गेहलोत खालीच उभे राहून वरून आलेली दोरी खेचताना दिसतात. त्यामुळे ध्वज फडकला आहे अथवा नाही हे मुख्यमंत्र्यांना दिसतच नाही. शिवाय, ते ध्वजाला सलाम करतात तेव्हा ध्वज त्यांच्या मागे असतो. एकूणच गेहलोत यांच्या ध्वजवंदनाच्या या रुक्ष प्रकारावर लोक संतप्त झाले आहेत. वर ध्वजस्तंभाजवळ पोलिस अधिकारीही आहेत. मग तिथेच जाऊन गेहलोत ध्वजवंदन का करत नाहीत, असाही प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे.