राजपथ आता कर्तव्यपथ

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला ‘राजपथ’ म्हणून ओळखले जाते.

राजपथ आता कर्तव्यपथ

राजधानी दिल्लीमधील ऐतिहासिक अशा राजपथाचे नाव मोदी सरकार बदलणार असल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे आता नवी दिल्लीमधील प्रसिद्ध राजपथाचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या अशा राजपथाचे नाव ‘कर्तव्यपथ’ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला ‘राजपथ’ म्हणून ओळखले जाते. याच मार्गाला आता ‘कर्तव्यपथ’ असे ओळखले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.

राजपथाच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा  ऍव्हेन्यूमध्ये राज्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल, ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, लॉन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा अशा सुविधा असणार आहेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली होती.

हे ही वाचा:

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

दोन दशकानंतर पाकिस्तानने दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारला

लिज ट्रस लवकरच घेणार ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ

अफगाणिस्तानमध्ये रशियन दूतावासाजवळ स्फोट, २० जण ठार

मोदी सरकारने यापूर्वी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘रेस कोर्स रोड’चे नाव बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ असे केले होते. तसेच राजधानीतील प्रतिष्ठित भाग असलेल्या ल्यूटन्समधील पाच रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी भाजपाने दिल्ली महापालिकेकडे केली आहे. अकबर रोड, तुघलक रोड ही नावे बदलण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.

Exit mobile version