दिल्लीतील राजपथचे नाव आता कर्तव्यपथ होणार असे वृत्त प्रसिद्धीस आल्यानंतर त्याची देशभरात प्रचंड चर्चा होत असून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
यानिमित्ताने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. त्यात रजनीकांत यांचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाजी द बॉस हा रजनीकांत यांचा गाजलेला चित्रपट आहे. त्यातील एका दृश्यात रजनीकांत मातीच्या रस्त्यावरून चालत जातात आणि मागून तोच रस्ता डांबरी होत जातो, अवतीभवतीचा परिसरही हिरवाईने नटतो. छोटी छोटी घरे टुमदार घरांमध्ये रूपांतरित होतात. राजपथचे कर्तव्यपथ होत असताना हा प्रसंग त्याच्याशी कसा मिळताजुळता आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न कुणीतरी केला आहे. त्याबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक होते आहे.
India's progress after Rajpath is renamed as Kartavya Path#Rajpath #KartavyaPath pic.twitter.com/MSx2yW7QHf
— TheNikhil (@vermanikhilv) September 6, 2022
राजपथवर नेहमी स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनी सेनादलांची परेड होते. या पथाला आता कर्तव्यपथ हे नाव देण्याचा मानस आहे. केंद्र सरकारने गुलामीची चिन्हे पुसून टाकण्याचा निश्चय केलेला आहे. त्यानुसार हे निर्णय घेतले जात आहेत. नौदलाचा ध्वजही छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामीच्या सर्व आठवणी आम्ही पुसून टाकणार आहोत, असा निर्धार व्यक्त केला होता. त्याचेच एक पाऊल म्हणजे राजपथचे कर्तव्यपथ असे नामकरण.
हे ही वाचा:
नितेश राणे यांच्या गाडीला अपघात पण कुणालाही इजा नाही
मुंबईकरांचे मोबाईल फोन्स पाकिस्तानात
पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला
ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी
मोदी सरकारने यापूर्वी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘रेस कोर्स रोड’चे नाव बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ असे केले होते. तसेच राजधानीतील प्रतिष्ठित भाग असलेल्या ल्यूटन्समधील पाच रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी भाजपाने दिल्ली महापालिकेकडे केली आहे. अकबर रोड, तुघलक रोड ही नावे बदलण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्याशिवाय, दिल्लीतील इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवून त्यांचे स्मरण केंद्र सरकारने केलेले आहे. त्यामुळे एकूणच केंद्र सरकारच्या या निर्णयांची जनसामान्यांनी स्तुती केली आहे.