25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषरजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो

रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो

जेलर चित्रपटाची सर्वत्र सध्या चर्चा

Google News Follow

Related

सुपरस्टार रजनीकांत अभिनित चित्रपटांची त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. त्यांचा नुकताच ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याची जोरदार कमाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सुपरस्टार रजनीकांत शुक्रवारी संध्याकाळी लखनऊला पोहोचले आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबच चित्रपट पाहणार आहेत, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच, चित्रपटाच्या यशाबद्दल त्यांना विचारले असता, ‘ही सर्व ईश्वराची कृपा आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

सुपरस्टार रजनीकांत चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध शहरांचा दौरा करत आहेत. यासाठी ते लखनऊलाही आले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ते स्वत:चा चित्रपट पाहतील. ते कदाचित लखनऊमधील काही धार्मिक स्थळांना भेटी देतील. त्याआधी त्यांनी रांची येथील छिन्नमस्ता मंदिराला भेट देऊन तेथे पूजाअर्चा केली. ते खूप वर्षांपासून या मंदिरात येण्याचा विचार करत होते. या मंदिराला भेट देऊन त्यांनी देवाचे दर्शन घेतले. ‘आता मला खूप प्रसन्न वाटत आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांना दिली. त्यांनी तिसऱ्यांदा या मंदिराला भेट दिली. तसेच, दरवर्षी या मंदिराला भेट देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही

रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’

उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत

म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी

सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनियकन, योगी बाबू आणि मोहनलाल आहेत. चित्रपटात जॅकी श्रॉफ यांचीही छोटी परंतु महत्त्वाची भूमिका आहे. आठ दिवसांत या चित्रपटाने २३५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा