दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली पण ही भेट घेताना चक्क रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना चरणस्पर्श केला आणि त्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली.
शनिवारी आपल्या जेलर या चित्रपटाच्या शोच्या निमित्ताने रजनीकांत उत्तर प्रदेशमध्ये आलेले आहेत. तिथे या चित्रपटाचा शो ते योगी आदित्यनाथ यांच्यासह पाहणार होते. त्यासाठी जेव्हा ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले तेव्हा दरवाजातच त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पायाला स्पर्श केला. रजनीकांत यांनी दाखविलेल्या या आदराबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. योगी आदित्यनाथ यांनी रजनीकांत यांचे स्वागत केले.
हे ही वाचा:
निवडणुकांची भीती नेमकी कोणाला?
नितीन गडकरींनी फेटाळला कॅग अहवालाचा दावा
देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही
भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार
रजनीकांत यांनी पायाला स्पर्श केल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हात जोडून त्यांच्या भावना स्वीकारल्या. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विशेषतः भाजपविरोधकांमध्ये दुःखाची छाया पसरली. डाव्यांनी त्याविरोधात पोस्ट लिहिल्या. एकाने म्हटले की, रजनीकांत यांची ही कृती कणाहीन असल्याचे निदर्शक आहे. त्यांची पातळी घसरली आहे. एकाने म्हटले आहे की, रजनीकांत यांनी योगींच्या पायाला स्पर्श करून आदराची भावनाच व्यक्त केली आहे.
#WATCH | Actor Rajinikanth meets Uttar Pradesh CM Yogi Adityanath at his residence in Lucknow pic.twitter.com/KOWEyBxHVO
— ANI (@ANI) August 19, 2023
रजनीकांत यांनी या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटाला हे जे यश मिळत आहे त्यामागे देवाचा आशीर्वादच आहे, असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यावर आदित्यनाथ यांनी त्यांना एक पुस्तक आणि एक भेटवस्तू दिली आणि त्यांचे स्वागत केले.
रजनीकांत यांनी झारखंडलाही भेट दिली होती. तिथे प्रसिद्ध चिन्नमस्त मंदिरालाही त्यांनी भेट दिली आणि प्रार्थना केली. रांची येथे यागोदा आश्रमातही त्यांनी काही काळ घालविला. त्यानंतर झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचीही त्यांनी भेट घेतली. रजनीकांत यांची जेलर ही फिल्म १० ऑगस्टला रीलिज झाली आहे. आठ दिवसात या चित्रपटाने २३५.६५ कोटींचा गल्ला जमविला आहे.