सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

दक्षिणेतील सुप्रसिद्ध कलाकार रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीच्या विज्ञान भवनात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडून भारतातील सर्वोच्च चित्रपट सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन रजनीकांत यांच्या कारकिर्दीला गौरवण्यात आले. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी बस कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या सुपरस्टारने हा पुरस्कार त्याच्या जुन्या बस ड्रायव्हर मित्राला समर्पित केला, ज्याने त्याला चित्रपटांमध्ये येण्याचे सुचवले.

रजनीकांत यांनी आपला दादासाहेब फाळके पुरस्कार दिवंगत चित्रपट निर्माते के बालचंदर यांनाही समर्पित केला. ज्यांनी रजनीकांतचा पहिला चित्रपट अपूर्व रागंगल, त्यांचे भाऊ सत्यनारायण राव याचबरोबर त्यांचे दिग्दर्शक, निर्माते, थिएटर मालक, तंत्रज्ञ आणि चाहते यांनाही समर्पित केला. त्यांनी त्यांचा जावई धनुषसोबत या सोहळ्याला हजेरी लावली. धनुषला ‘असुरान’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. रजनीकांत यांची पत्नी लता आणि मुलगी ऐश्वर्याही तिथे होत्या.

गायिका आशा भोसले आणि शंकर महादेवन, अभिनेते मोहनलाल आणि विश्वजीत चॅटर्जी आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या बनलेल्या ज्युरीने या वर्षाच्या सुरुवातीला या सन्मानासाठी रजनीकांत यांची निवड केली होती. आज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेते विश्वजित चॅटर्जी म्हणाले की त्यांनी रजनीकांत यांची निवड या सन्मानासाठी केली कारण ते एक “प्रतिभावान” व्यक्ती आहेत आणि तरीही त्यांचा साधेपणा टिकून आहे.

हे ही वाचा:

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

शिवाजी, एन्थिरन, नल्लावानुकु नल्लावन, थलापथी, अन्नामलाई, श्री राघवेंद्र, पेद्दरायुडू, चंद्रमुखी, नट्टुक्कू ओरू नल्लावन, दरबार आणि बाशा या चित्रपटांमधील ब्लॉकबस्टर अभिनयासाठी रजनीकांत ओळखला जातो.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दरबारमध्ये त्यांनी शेवटचे काम केले होते. त्याचा नवीन चित्रपट अन्नाते पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version