जम्मू आणि काश्मीरमधील पूंच जिल्ह्यात मारल्या गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या नातेवाइकांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी भेट घेतली. जम्मू काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते.
२२ डिसेंबर रोजी झालेल्या एका विचित्र घटनेत तीन सर्वसामान्य नागरिकांचे मृतदेह आढळले होते. जम्मू काश्मीरमधील पूंच जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाल्यनंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी लष्कराने तपास सुरू केला आहे.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पूंचमध्ये भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठकही घेतली. तर, बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मारल्या गेलेल्या तीन सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हादेखील होते. हे सर्व जण बुधवारी दुपारी राजौरी येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे जाऊन जखमी नागरिकांच्या प्रकृतीचीही चौकशी केली.
हे ही वाचा:
बाजारात तुरी… पण संपत नाही हाणामारी
पुण्यातील विमाननगर भागात १० सिलिंडर फुटले!
काशीच्या संतांकडून २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची मागणी!
युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज
‘संरक्षणमंत्र्यांनी नागरिकांच्या कुटुंबीयांची, नागरी समुदायाची भेट घेऊन घटनेच्या चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले,’ असे डाक बंगला येथील बैठकीला उपस्थित असलेले माजी आमदार शहनाज गनई यांनी सांगितले.