भारतातील सर्वात वयोवृद्ध सरिस्काची वाघीण ‘राजमाताचा’ मृत्यू!

वाघिणीच्या शेपटीला दुखापत झाल्याने सुरु होते उपचार

भारतातील सर्वात वयोवृद्ध सरिस्काची वाघीण ‘राजमाताचा’ मृत्यू!

राजस्थान मधील सरिस्का व्याघ्र प्रकल्पात उपचार घेत असलेल्या ‘एसटी-२’ (१९) या देशातील सर्वात वृद्ध वाघिणीचा मंगळवारी मृत्यू झाला.या वाघिणीला २००८ मध्ये सरिस्का येथे स्थलांतरित करण्यात आले होते.सरिस्कामध्ये ‘एसटी-२’ या वाघिणीची ‘राजमाता’ म्हणून ओळख होती.या राजमाता वाघिणीने, वाघीण ST-७, ST-८, ST-१३ आणि ST-१४ यांना जन्म दिला होता.वाघिणीच्या शेपटीला दुखापत झाल्यामुळे दोन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरु होते.

राजमाता वाघीण ‘एसटी-२’ अनेक दिवसांपासून आजारी होती.या कारणास्तव तील बंदिस्त करण्यात आले होते. सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील मॉनिटरिंग टीमने मंगळवारी संध्याकाळी बातमी दिली की सरिस्का वाघिणी एसटी-२ हालचाल करत नाही. यानंतर कर्मचार्‍यांनी आवारात जाऊन तपासणी केली असता वाघिणी मृतावस्थेत आढळून आली.

सरिस्काचे डीएफओ डीपी जगवत यांनी सांगितले की, एसटी-२ या वाघिणीचे वय वाढल्याने तिला उपचारासाठी नया पानी कर्णवास परिसरात ठेवण्यात आले होते. ST-२ वाघिणीच्या शेपटीला जखम झाल्यामुळे, मुख्य वन राखीव सारिस्का यांनी गठित केलेल्या अधिकारी आणि डॉक्टरांच्या समितीच्या देखरेखीखाली वाघिणीवर उपचार केले जात होते. ही वाघीण बराच वेळ बंदिस्त होती.

हे ही वाचा:

मोदी युग भारताला वैभवाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

राहुल गांधींच्या न्याय यात्रेला सुरुवात होण्याआधीच मणिपूर सरकारचा मैदान देण्यास नकार!

राममंदिर प्राणप्रतिष्ठा, शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार

दरम्यान, रणथंबोरहुन ४ जुलै २००८ मध्ये ‘एसटी-२’ वाघिणीला राजस्थान मधील सरिस्का येथे स्थलांतरित करण्यात आले होते.वाघीण माशाची ही संतती होती.रणथंबोरमधील वाघीण माशा ही १८ वर्षे जगली तर सरिस्कातील राजमाता वाघीण १९ वर्षांहून अधिक काळ जगली. ती सरिस्काची सर्वात जुनी वाघीण होती.

एकेकाळी वाघ नसलेल्या सरिस्काला ST-२ वाघिणीने दिली ओळख
ST-2 या वाघिणीच्या आगमनानंतर सरिस्काची भरभराट झाली. सरिस्का येथे या वाघिणीने ST-७, ST-८, ST-१३, ST-१४ या वाघिणींना जन्म दिला. यानंतर सरिस्कामध्ये वाघांचे वंश वाढत गेले. आज सरिस्कामध्ये ३० वाघ, वाघिणी आणि पिल्ले आहेत.राजमाता वाघिणीच्या मृत्यूही बातमी कळताच वन्यप्रेमींकडून शोक व्यक्त केला जात आहे.

 

Exit mobile version