राष्ट्र जागरणासाठी जिजाऊंचे चरित्र प्रेरणादायी; दिल्लीत प्रथमच राजमाता जिजाऊ जयंती

सुनील देवधर यांच्या संकल्पनेतून माय होम इंडियाने आयोजित केला होता कार्यक्रम

राष्ट्र जागरणासाठी जिजाऊंचे चरित्र प्रेरणादायी; दिल्लीत प्रथमच राजमाता जिजाऊ जयंती

दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी प्रथमच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारतामध्ये दीर्घकाळपर्यंत मराठा साम्राज्य आणि शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास झाकून ठेवण्यात आला. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खरा इतिहास पुढे येत आहे. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय हे भारताचे आदर्श आहेत, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी व्यक्त केले. माय होम इंडियातर्फे आयोजित राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

हिंदू साम्राज्याचा इतिहास दाबून ठेवला गेला

यावेळी जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, माय होम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार नारीशक्तीसाठी काम करत आहेत. जिजाऊंची जयंती साजरी करणे हे महत्वाचे. गेली ७५ वर्षे आपला इतिहास चुकीचा सांगितला. मात्र, जिजाऊ आणि शिवराय हे आपले आदर्श आहेत. मराठा साम्राज्य हे भारतातील अखेरचे हिंदू साम्राज्य होते. मात्र, हा इतिहास गेली ७५ वर्षे जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये जेएनयूसह डाव्या इतिहास्कारांचा मोठा वाटा आहे. आता मात्र पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी इतिहास जगासमोर येत असल्याचे त्या म्हणाल्या.

भारतात डाव्या नव्हे तर भारतीय दृष्टिकोनातून फेमिनिझम शिकवण्याची गरज डॉ. पंडित यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, सडेतोड प्रश्न विचारणारी द्रौपदी आणि सीता या आमच्या आदर्श आहेत. त्यामुळे मार्क्सच्या चष्म्यातून फेमिनिझम शिकण्याची आणि शिकवण्याची गरज नाही. जेएनयूची पहिली महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती होण्यास एवढा काळ लागणे हा देशातील डाव्या आणि कथित लिबरल लोकांचा पराभव आहे. मात्र, मोदी सरकारच्या काळात खऱ्या अर्थाने भारतीय दृष्टीने महिला सक्षमीकरण साध्य होत असल्याचेही डॉ. पंडित यांनी यावेळी नमूद केले.

आपल्या कुटुंबातील मुलीला सक्षम करा, असा संदेश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी दिला. त्या म्हणाल्या, आपली मुलगी सक्षम करणे, तिला स्वातंत्र्य देणे आणि संवाद साधणे आवश्यक आहे. तसे केल्यास विवाहाद्वारे बेकायदेशीर धर्मांतर रोखणे शक्य आहे. त्याचप्रमाणे समाजात प्रत्येकाची भूमिका बदलत असते, मात्र आईची भूमिका कधीही बदलत नाही. त्यांच्या भूमिकेत वाढच होत असते. पुरुषांनीदेखील आपल्यामध्ये मातृत्वाची भावना निर्माण करण्याची गरज आहे. जबाबदाऱ्या केवळ आईवरच टाकू नका, असेही आवाहन शर्मा यांनी यावेळी केले.

हे ही वाचा:

नाशिकमधून सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष अर्ज, काँग्रेसची गोची

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

शिवसेनेचे गूळ लावा, गोड गोड बोला!

राष्ट्र सेविका समितीच्या चारू कालरा यांनी महिलांना त्यांच्या सामर्थ्याची ओळख करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष नयना सहस्रबुद्धे यांनी व्यक्तिगत उत्कर्ष, कौटुंबिक उत्कर्ष, शैक्षणिक उत्कर्ष आणि राष्ट्रनिर्माणासाठी सज्ज होणे हे महिला सक्षमीकरणाचे चार मुख्य पैलू असल्याचे सांगून जिजाऊ म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या प्रेरणा. नेतृत्व, मातृत्व आणि कर्तृत्वाचा संगम असल्याचे नमूद केले.

राष्ट्राच्या उद्धारासाठी सर्व महिलांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनीच हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यासाठी त्यांचे कार्यकर्तृत्व दिल्लीत मांडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

सीताराम, लक्ष्मीनारायण ही पुरुषांची आपल्या संस्कृतीत आहेत. मात्र सीताराम येचुरी आणि भारत जोडो यात्रा काढणाऱ्या नेत्यांना भारतीय संस्कृतीचे हे तत्व कधीही समजू शकत नाही. त्यामुळे पदयात्रा करणारे नेते सध्या काहीही बरळत आहेत. काँग्रेस विसर्जन करण्याचा महात्मा गांधी यांचा संदेश राहुल गांधी यांनीच मनावर घेतल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगविला.

Exit mobile version