हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा, राजीव कपूर यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा, राजीव कपूर यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा दुःखात बुडाली आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते- सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे पुत्र- राजीव कपूर यांचे ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. स्वर्गीय ऋषी कपूर यांची पत्नी नितू कपूर यांनी सर्वात पहिल्यांदा इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली. त्यांनी राजीव कपूर यांच्या फोटोखाली आरआयपी असे लिहीले होते.

यानंतर अनेक प्रसिद्ध व्यक्तिंनी ट्वीटरवरून श्रद्धांजली व्यक्त केली आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अभिनेते सनी देओल, रणदीप हुडा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

राजीव कपूर यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात १९८३ सालातल्या ‘एक जान है हम’ या चित्रपटाच्या मार्फत केली होती. मात्र हिरो म्हणून त्यांनी राज कपूर यांच्या दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीतल्या शेवटच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून १९८५ मध्ये पदार्पण केले.

यानंतर त्यांनी ‘आसमान’ ‘लव्हर बॉय’ ‘जबरदस्त’ ‘हम तो चले परदेस’ या चित्रपटातून काम केले आहे. राजीव कपूर यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे ‘जिम्मेदार’. त्यानंतर ते चित्रमट निर्मीतीकडे आणि दिग्दर्शनाकडे वळले.

त्यांची पहिली निर्मीती म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर यांनी दिग्दर्शीत केलेला ऋषी कपूर यांची भूमिका असलेला ‘हेन्ना’ हा चित्रपट.

राजीव कपूर हे सर्व कपूर भावंडांत धाकटे होते. त्यांचे वडिल बंधू म्हणजे रणधीर आणि ऋषी कपूर तर त्यांच्या मोठ्या बहिणी ऋतू नंदा आणि रिमा जैन या आहेत. त्यांची सर्वात मोठी बहिण ऋतू नंदा आणि वडील बंधू ऋषी कपूर हे मागील वर्षी जानेवारी आणि एप्रिल महिन्यात निधन पावले.

Exit mobile version