गुडीपाडवा सणानिमित्त राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल होणार का याविषयीच्या चर्चा सुरू आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना निर्बंधाबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. युरोप, चीन, साऊथ कोरिया या देशांमध्ये वाढणारी रुग्णसंख्या पाहता सतर्कता बाळगावी लागेल. त्यामुळे सध्या तरी पूर्णपणे मास्क मुक्तीचा विचार केलेला नाहीये, असे राजेश टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय की, लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याचे सरकारचा प्रयत्न आहे. परदेशामध्ये कोरोनाचा धोका वाढतो आहे. त्यामुळे मास्क मुक्तीचं धाडस शक्य नाहीये. त्यामुळे आगामी सणवार साजरे करताना काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायला हवा. तुर्तास तरी संपूर्णपणे मास्क मुक्तीचा कसलाही विचार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले, तसेच गुढीपाडव्याबाबत निर्णय आणि मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.
हे ही वाचा:
शरद पवारांच्या युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग
कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक
आदित्य ठाकरे यांच्या सूचनेला बारसू ग्रामस्थांचा विरोध
महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?
डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या माध्यमातून जे निर्बंध लावले जातात, त्यासंदर्भात वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात, त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो. त्यानंतर कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन आम्ही त्याबद्दल निर्णय घेतो. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून उरलेले निर्बंध तसेच ठेवले आहेत. लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याचे सरकारचा प्रयत्न आहे.