राजस्थानमधील दौसाच्या सालसवाल तुरुंगातील एका कैद्याने शुक्रवारी रात्री राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. २९ वर्षीय रिंकू असे त्याचे नाव आहे.
आरोपी एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने जयपूर पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे वृत्त एजन्सी पीटीआयने पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे. धमकीचे कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल फोनचे लोकेशन सालसवास कारागृहात ट्रेस करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, कारागृह परिसरात पहाटे ३ ते ७ या वेळेत चार तासांच्या तीव्र शोध मोहिमेनंतर फोन जप्त करण्यात आला.
हेही वाचा..
महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ युट्युबवर अपलोड प्रकरणी; तिघांना अटक
संभल हिंसाचार : १२ पैकी ६ प्रकरणात आरोपपत्र दाखल
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष पाहुणे
कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बससह चालकाला फासले काळे; कन्नड बोलण्याची सक्ती
याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जुलै २०२४ मध्ये दौसा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने सीएम शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यापूर्वी त्याच वर्षी जानेवारीमध्ये जयपूर मध्यवर्ती कारागृहातील एकाने जयपूर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून शर्मा यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती.