26 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषआता महाभारत येणार १० भागांत, राजामौली लिहिणार पटकथा

आता महाभारत येणार १० भागांत, राजामौली लिहिणार पटकथा

पटकथा लिहिल्यानंतरच त्यात कोण अभिनेते कोणत्या भूमिका रंगवतील,हे राजामौली ठरवणार

Google News Follow

Related

बाहुबली आणि आरआरआर या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे महाभारतावर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. त्यांना त्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टबद्दल विचारल्यावर त्यांनी ‘मी महाभारत चित्रपट बनवला तर तो १० भागांत बनवेन. तरच मी त्याला न्याय देऊ शकेन’, असे सांगितले आहे.

मी खऱ्या महाभारताला माझ्या पद्धतीने वळण देईन आणि पटकथा लिहिल्यानंतरच मी त्यात कोण अभिनेते कोणत्या भूमिका रंगवतील, हे ठरवेन, असेही ते म्हणाले. जर मी महाभारतावर चित्रपट बनवण्याचे ठरवले तर मला महाभारताचे खंड वाचण्यासाठीच एक वर्ष लागेल. त्यामुळे आता या वेळेला मी एवढेच सांगू शकतो की, मी कदाचित हा चित्रपट १० भागांत बनवेन, असे त्यांनी सांगितले.

या चित्रपटावर तुम्ही लवकरात लवकर काम सुरू करणार आहात का, या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले. ‘ मी जेव्हा कोणताही चित्रपट बनवतो, तेव्हा मला वाटतं की महाभारत चित्रपट बनवण्यासाठी काहीतरी शिकतो आहे. महाभारतावर चित्रपट बनवणे हे माझे स्वप्न आहे आणि मी प्रत्येक पावलागणिक त्या चित्रपटाच्या दिशेने जात आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आरआआरच्या प्रसिद्धी कार्यक्रमादरम्यान अभिनेता रामचरण याने राजामौली यांना महाभारत चित्रपटाबद्दल विचारले होते, त्यावरही त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली होती. ‘महाभारताच्या ज्या व्यक्तिरेखा मी लिहीन, त्या तुम्ही कधीही ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या नसतील. मी महाभारत माझ्या स्टाइलने लिहीन. महाभारताची गोष्ट तीच राहील, परंतु व्यक्तिरेखांचे स्वभाव आणि एकमेकांशी असलेले नाते वेगळे असेल,’ असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, हे न्यायालयाचे मत महत्त्वाचे!

रक्ताच्या पिशव्या गरजूंपर्यंत उडत गेल्या!

आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केले!

पंतप्रधान मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर

राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटाने प्रचंड यश मिळविले होते. त्याचे दोन्ही भाग चांगलेच लोकप्रिय ठरले. त्यानंतर आलेल्या आरआरआर याने तर आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली. नाटू नाटू या गाण्याने तर ऑक्सरमध्ये स्थान मिळविले. या गाण्याला पुरस्कारही मिळाला.

या चित्रपटाची गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. त्यासाठी महाभारतातील पात्रांची कल्पना करण्यात आली होती. फरहान अख्तर अर्जुन, कर्ण म्हणून ऋतिक रोशन, भीष्म अमिताभ बच्चन, प्रभास भीम, दुर्योधन अजय देवगण, दुःशासन अभिषेक बच्चन, शकुनी गुलशन ग्रोव्हर, रजनीकांत द्रोणाचार्य, कमल हसन शांतनू, ऐश्वर्या राय गंगा, दीपिका पदुकोण द्रौपदी अशी नावे पुढे आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा