27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषइर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’

जीवनावश्यक वस्तू पुरवणार  

Google News Follow

Related

रायगडमधील इर्शाळगडाजवळील इर्शाळवाडी गावावर बुधवार, १९ जुलै रोजी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं असून गुरुवारपासून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. पावसामुळे आणि खराब वातावरणामुळे मदतकार्यात अडथळे येत असून अद्याप शोधकार्य सुरू आहे.

एनडीआरएफ आणि अनेक स्वयं सेवी संस्थांच्या मदतीने मलाबा हटवण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांच्या पाठीशी सर्व स्तरांवरून मदतकार्य पोहचत आहे. या संकटाच्या काळात इर्शाळवाडी येथील ग्रामस्थांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ ‘लालबागचा राजा’ धावून आले आहे.

महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी आणि मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंची मदत मंडळाकडून करण्यात येणार आहे. शुक्रवार, २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून इर्शाळवाडीकडे रवाना केली जाणार आहे. दरम्यान, इर्शाळवाड येथे सध्या एनडीआरएफच्या बचाव पथकासोबत पनवेल महापालिकेचे बचाव पथक, सिडकोचे मजूर आणि स्थानिक ट्रेकर्सचा एक गट मदतकार्य करत आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमधील भयंकर व्हिडिओप्रकरणी चौघांना अटक

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

शांतता राखा… मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन

विनेश, बजरंगच्या निवडीविरोधात खेळाडू, पालकांचे आंदोलन

मुंबईसह कोकणात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी भूस्खलन झाले. या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. मात्र, सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज पहाटे ५ वाजेपासून पुन्हा हे काम सुरू करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा