राज ठाकरेंचे आवाहन; वाढदिवशी मला ही भेट द्या!

फेसबुकवर लिहिली पोस्ट

राज ठाकरेंचे आवाहन; वाढदिवशी मला ही भेट द्या!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवार, १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी त्यांच्या चाहत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे अनोखी भेटवस्तू मागितली आहे. तसेच त्यांनी शुभेच्छा द्यायला येताना कुणीही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येऊ नका, असंही आवाहन केलं आहे. यासंदर्भातील पोस्ट राज ठाकरेंनी फेसबुकवर टाकली आहे.

राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, दरवर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.

हे ही वाचा:

‘आदिपुरुष’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी, ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली

अमेरिकेतील भारतीय रेस्टॉरंटमध्ये ‘मोदीजी की थाली’

मालेगावात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली धर्म परिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न

भारताच्या पराभवानंतर गावस्कर संतापले

पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल, ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.

अशा आशयाची पोस्ट लिहून राज ठाकरेंनी वाढदिवसाचा योग साधून पर्यावरण आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीचा नवा संकल्प केला असून त्याचे कौतुक केले जात आहे.

Exit mobile version