राज ठाकरे यांची बाबासाहेबांसाठी लिहिले पत्र

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खास पत्र लिहून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज ठाकरे यांची बाबासाहेबांसाठी लिहिले पत्र
६ डिसेंबर १९५६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले. आज लोक त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी चैत्यभूमी, दादर येथे येतात. अथांग जनसागर यानिमित्ताने तिथे लोटतो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी श्रद्धांजली वाहिली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खास पत्र लिहून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी बाबासाहेबांची अनेक वैशिष्ट्ये आपल्या या पत्रात नमूद केली आहेत.
” बालविवाह, बहुपत्नीत्व ह्या मुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय-हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले  पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधिक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीचा सामान वाटा, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं…” असे त्यांनी त्या पोस्ट मध्ये लिहिलं.
https://twitter.com/RajThackeray/status/1599969366980071424?s=20&t=0e-xeiZOcpkH6XWIx6MVtQ

हे ही वाचा:

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर निष्णात कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ज्ञ, राज्यशास्त्रज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले द्रष्टे राष्ट्रीय नेते होते. अशा ह्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम,’ असे म्हणत राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
Exit mobile version