25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषशिवसेना, धनुष्यबाण ही शिंदे, उद्धव यांची प्रॉपर्टी नाही!

शिवसेना, धनुष्यबाण ही शिंदे, उद्धव यांची प्रॉपर्टी नाही!

राज ठाकरे यांनी केली टीका

Google News Follow

Related

शिवसेना आणि धनुष्यबाण ही कुणाचीही प्रॉपर्टी नाही ती फक्त बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी आहे. एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नाही अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवलीत सोमवारी झालेल्या सभेत टीकास्त्र सोडले.

राज ठाकरे हे आपले उमेदवार राजू पाटील यांच्या सभेसाठी तिथे आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावरही शरसंधान केले. सध्या विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षात चढाओढ दिसून येते आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचे दिसते आहे. विशेषतः माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर उभे आहेत. त्यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

हे ही वाचा:

विवाहित हिंदू महिला आणि तिच्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!

मुस्लिम, दलित साथ न मिळाल्याने मनोज जरांगे यांची निवडणुकीतून माघार!

कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला, भाविकांना लाठीमार!

ते म्हणाले की, एकनाथ शिंदे जेव्हा भाजपासोबत आले तेव्हा त्यांना अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून कसे बसायचे हा प्रश्न त्यांना पडलेला होता. पण अजित पवारच जेव्हा महायुतीत आले तेव्हा शिंदे यांना बोलता येत नव्हते. त्यांची कोंडी झाली.

राज ठाकरे म्हणाले की, आमचा राजू पाटील एकटाच विधानसभेत होता पण तो विकणारा नव्हता, टिकणारा होता. माझे चिन्ह, पक्ष घेऊन गेला असता पण आमच्या सहकाऱ्यांच्या डोक्यात अशा गोष्टी येत नाहीत. शरद पवार यांच्याशी मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचेच अपत्य आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा