माहीम विधानसभा मतदारसंघ बाबतीत काहीच तोडगा न निघाल्याने आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे महायुती शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर तर दुसरीकडे मनसेचे अमित ठाकरे आणि तिसरीकडे ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिरंगी लढत असणार आहे. शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मनसेची इच्छा होती. भाजपाही अमित ठाकरेंसोबत असेल अशी चर्चा होती. मात्र, सदा सरवणकर निवडणुकीवर ठाम होते. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सदा सरवणकर आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र, राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली. त्यामुळे आता निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.
सदा सरवणकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, राज ठाकरेंना भेटण्यासाठी माझा मुलगा आणि माझे चार पदाधिकारी गेले होते, तसेच बाजूलाच वडील (सदा सरवणकर) उभे आहेत आणि तुम्हाला भेटू-निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात, असे माझ्या मुलाने राज ठाकरेंना सांगितले. यावर राज ठाकरे म्हणाले, ‘मला काहीही बोलयाचे नाही, तुम्हाला मागे घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर लढा.’ त्यामुळे पुढे काहीच बोलणे झाले नाही, त्यांनी भेट सुद्धा नाकारली. अशामुळे आता निवडणूक लढवावीच लागेल. आता विषय संपलेला आहे, मी लढवणार आहे, असे सदा सरवणकर म्हणाले.
हे ही वाचा :
गोपाळ शेट्टींची बोरिवलीतून माघार, संजय उपाध्याय यांची उमेदवारी कायम!
प्रवासी खचाखच भरले, उत्तराखंडमध्ये बस कोसळून ३६ ठार!
कलम ३७० रद्द करण्याच्या ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत कल्लोळ
जरांगेंची निवडणुकीतून माघार, भुजबळ म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये’
ते पुढे म्हणाले, तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांची भेट झाली नाही, तर आता निवडणूक लढवणे भागच आहे. महायुतीचा उमेदवार म्हणूनच मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. राज ठाकरेंसमोर एक नाहीतर दोन्ही हात पुढे करून उभे होतो. राज ठाकरेंनी काही सांगितले असते तर आम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत होतो, त्यांच्या आदेशाप्रमाणे वागायचे ठरवले होते. मात्र, राज ठाकरेंनी भेटच नाकारली. ही जी भेट घ्यायला सांगितली होती, ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात सुद्धा तसेच होते, कारण यातुन काहीतरी तडजोड करून हे संपलं पाहिजे. मात्र, राज ठाकरेंनी भेटच नाकारल्याने आता निवडणूक लढवणार आहे, असे शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी म्हटले.