‘मराठी भाषा जाती- पातीत अडकून राहू नये’

‘मराठी भाषा जाती- पातीत अडकून राहू नये’

रविवार, २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. याच दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, जर तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर समोरचा तुमच्या भाषेशी जुळवून घेतो. मराठीमध्ये व्यवहार सुरू करा असं राज ठाकरे म्हणाले.

“आज काल भाषा ही जाती- पातीमध्ये अडकवून ठेवली जाते. त्याला जातीचा रंग दिला जातोय. पण मराठी भाषा, मराठी संस्कार हे जातीत अडकून राहू नये, जातीय अस्मितांपलिकडे जाऊन मराठी जपली पाहिजे,” असे राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातीमध्ये बोलतात, त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान वाटतो. मग आपल्याला मराठीचा अभिमान का वाटायला नको असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज्यात इतर भाषेचा प्रभाव वाढतोय पण त्यामुळे मराठी काही संपणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

“हिंदी भाषा ही फार काही जुनी नाही. पण आपल्याला हिंदी येते. आज जो काही हिंदी भाषेचा प्रभाव आहे तो केवळ चित्रपटांमुळेच आहे. आपण काय त्याचे साहित्य वाचलेले नसते. त्यामुळे अशाच माध्यमातून मराठी भाषेचा विस्तार केला पाहिजे,” असे राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

आंतरराष्ट्रीय तिरंदाजाची उपसंचालक चोरमलेंविरोधात विनयभंगाची तक्रार

हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वा. सावरकरांचा विसर

कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी

हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वा. सावरकरांचा विसर

“भाषा टिकवायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनीच मराठी बोललं पाहिजे. तुम्ही तुमच्या भाषेत अडकला तर तुम्ही जागतिक स्तरावर स्पर्धा करु शकणार नाही असं जे बोलतात ते चुकीचं आहे. आपल्या भाषेची लाज वाटायला नको. महात्मा गांधी, टागोर हे त्यांच्या मातृभाषेत बोलत होते,” असे राज ठाकरे म्हणाले.

Exit mobile version