राज्यात पुन्हा बरसणार जलधारा

राज्यात पुन्हा बरसणार जलधारा

जुलै महिन्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर पावसाने राज्यात दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाने ओढ दिल्याने पेरणी धोक्यात आली होती. मात्र हवामानखात्याने दिलेल्या नव्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी सुखावणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा एकदा प्रादेशिक हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील कोकण विभागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील बहुतांश भागात मध्यम किंवा तुरळक पाऊस होण्याची शक्यता असल्याचे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी तुरळक, हालक्या पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाचा जोर वाढण्याची शक्याता आहे. याशिवाय मराठावाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे.

हे ही वाचा:

अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट

चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!

सावधान! रस्त्यावर थुंकणाऱ्याला करावी लागणार सेवा

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

याबद्दल हवामान विभागाकडून ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये एक व्हिडिओ देखील प्रकाशित करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली होती. यावेळी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे काही भागात मोठ्या प्रमाणात पूर आला होता.

Exit mobile version